esakal | सतत..सातपुडा पेटतोय; जंगली प्राण्यांचा होरपळुन मृत्यू !

बोलून बातमी शोधा

 forest fire

सतत..सातपुडा पेटतोय; जंगली प्राण्यांचा होरपळुन मृत्यू !

sakal_logo
By
अमोल महाजन

धानोराः धानोरापासून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी चिंचपाणी धरणाच्या वरील बाजूस गेल्या तीन दिवसांपासून वणवा पेटलेला असल्याने याठिकाणी हजारो हेक्टर वरील वृक्ष संपदा नष्ट झाल्या असून यात जंगली प्राण्यांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. याकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: मुस्लिम तरुणांकडून मानवता धर्माचे घडले प्रत्यक्ष दर्शन

सातपुडा पर्वतात गेल्या महिनाभरापासून आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नेमकं या आगी लागतात की लावल्या जातात याची वरीष्ठ पातळीवर चौकशी होऊन कठोर कारवाई करून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वणवा विझवण्यासाठी वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी वनप्रेमी करत आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे या वर्षीही सासुरवाशीणींची आखाजी होणार सासरीच..!

वन्य प्राण्यांच्या आगीत होरपळून मृत्यू

जंगलाला लागणाऱ्या वणव्यामुळे वन्यप्राणी सैरावैरा पळत सुटतात तर काही आपला जीव गमावून बसतात. या आगीत मौल्यवान वनस्पतींचे नुकसान होत असून पशुपक्षासहित वन्य प्राणी जखमी होऊन मृत्यूमुखी पडत आहेत.

img

ded animal

आग लागते की लावली जाते

सातपुडा पर्वतात पेटणारा हा वणवा लावला जातो की, लागतो हे अद्यापही स्पष्ट होत नाही. त्यामुळे होत असलेल्या या प्रकाराच्या मुळाशी गेल्याशिवाय हा सर्वप्रकार समजणार नाही. यासाठी वनविभागाने यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा: शिक्षण विभागाचा मदतीचा ‘ऑक्सिजन’

लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?

सातपुडा पर्वतावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात वणवा लागतो. दरम्यान गेल्या महिन्याभरात वनव्याच्या प्रमाणात वाढ झालेली असून एकही लोकप्रतिनिधी येथे भेटीसाठी अथवा वनकर्मचाऱ्याच्या अडचणी समजून घेण्यासाठी आले नाहीत. यामुळे सातपुडा पर्वताच्या वणव्याबाबत हे लोकप्रतिनिधी किती जागृत आहेत हे दिसून येते.

संपादन- भूषण श्रीखंडे