खबरदार बाहेर फिराल तर...अमळनेरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. तहसील आवार, धुळे रस्ता, बाजारपेठ आदी ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे. 

अमळनेर : जिल्ह्यात आजपासून लॉक डाऊन करण्यात आला आहे. अमळनेर शहरात पहिल्या दिवशी कडक अमलबजावणी होताना दिसून येत आहे. अत्यावश्यक रुग्णसेवा व मेडिकल वगळता सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. सर्वच मार्गांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनात कडक बंदोबस्त तैनात आहे.

नक्‍की पहा - चिंताजनक...अकरा जणांचा दिवसभरात मृत्यू; साडेचार हजाराचा टप्पा पुर्ण

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. तहसील आवार, धुळे रस्ता, बाजारपेठ आदी ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे. १३ जुलै पर्यंत लॉक डाऊनचे स्वयंशिस्तीने पालन करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आवर्जून वाचा - सावधान...लॉकडाउनमध्ये फिरणार तर काय होणार तुमच्यासोबत पहा; १३०० पोलिसांचा कडक बंदोबस्त
 
अमळनेरात कोरोना चारशेपार
अमळनेर तालुक्यात कोरोनाने 4 शतक पार केले असून चिंताजनक स्थिती आहे. त्यात 30 जणांचा मृत्य झाला आहे. नागरिक यास जबाबदार असून विनाकारण गर्दी करत असल्याने कोरोनाचा कहर सुरूच आहे. 

सोशल डिस्टनसिंग पाळावे 
बाजारात काल मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. बाजार समिती समोर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, तेथेही रस्त्यावरच कैरी विकणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होती. सोशल डिस्टनसिंगचे पालन होताना दिसत नाही. याबाबत बाजार समिती प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner lockdown strically follow and police action