जिल्हा बँक निवडणूकःआमदार अनिल पाटील यांची उमेदवारी दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बँक निवडणूकःआमदार अनिल पाटील यांची उमेदवारी दाखल

जिल्हा बँक निवडणूकःआमदार अनिल पाटील यांची उमेदवारी दाखल

अमळनेर ः मतदारसंघाचे आमदार तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Jalgaon District Central Bank) विद्यमान संचालक अनिल भाईदास पाटील (MLA Anil Patil) यांनी जिल्हा बँकेत संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक (Election) निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.

अनिल पाटील यांनी यंदाही अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातुनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून सलग दोन टर्म पासून बँकेत संचालक पदी ते कार्यरत असताना यंदाही विजयाचे पक्के दावेदार ते मानले जात आहेत.अमळनेर तालुक्यात सोसायटीच्या 91 मतदारांचे ठराव असून त्यापैकी बहुसंख्य मतदार आमदारांसोबत उमेदवारी दाखल करताना उपस्थित होते,याशिवाय काँग्रेस व सेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित राहिल्याने महाविकास आघाडी त्यांच्याच पाठीशी असल्याचे दिसून त्यामुळे आमदारांचे पारडे आजच भारी झाल्याचे चित्र आहे,सदर उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, सेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील,काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, डॉ. किरण पाटील, एल. टी. पाटील,प. स. चे सदस्य प्रविण पाटील,विनोद जाधव,प्रा अशोक पवार,दीपक पाटील,नाना अभिमन पाटील,मुन्ना साळुंखे, मुन्ना चौधरी, शिवाजीराव पाटील,समाधान धनगर,भगवान पाटील, यासह राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडीतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान सहकार क्षेत्रात आ.अनिल पाटील यांचा अनेक वर्षांपासून प्रचंड दबदबा असून एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे या बळावरच त्यांनी दोन टर्म पासून जिल्हा बँकेवर आपले प्रतिनिधित्व कायम ठेवले आहे.यंदा देखील अनिल पाटील यांची उमेदवारी असतांना त्यांच्या विरोधात कोण उमेदवारी दाखल करणार याबाबत अजून तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नसल्याने अनिल पाटील हेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत.