जळगावः बैलगाडी विहिरीत पडून शेतमजूरासह बैलाचा बुडून मृत्यू

रात्रीच्या वेळी शेतात बैलगाडीने जात असतांना अंधाऱ्यात विहिर न दिसल्यामुळे बैलगाडीसह ते पाण्यात पडले.
Death
Death
Updated on

यावल: तालुक्यातील बामणोद शिवारात बैलगाडीसहीत शेतमजूर (Agricultural labor) विहिरीत पडल्याने शेतमजूर आणि एका बैलाचा बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी रात्री उशीरा फैजपूर पोलीस ठाण्यात (Faizpur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Death
देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दांम्पत्याचा अपघात; रिक्षाने दिली धडक

विश्वनाथ रामसिंग सोनवणे (वय-६५, मूळ रा.हातेड,ता. चोपडा ह.मु. बामणोद ता. यावल) असे मयत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की विश्वनाथ सोनवणे हे सुरेश तुकाराम भंगाळे यांच्या शेतात शेताच्या कामाच्या निमित्ताने बामणोद शिवारात १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता बैलगाडीने गेले होते. दरम्यान रात्रीच्या वेळी शेतात बैलगाडीने जात असतांना अंधाऱ्यात विहिर न दिसल्यामुळे बैलगाडीसह ते पाण्यात पडले. यात एक बैल आणि विश्वनाथ सोनवणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी ८ वाजेच्या सुमारास लक्षात आला. सुरेश तुकाराम भंगाळे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर पाटील करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com