अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची सिनेस्टाइल 'रेड' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची सिनेस्टाइल 'रेड'

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची सिनेस्टाइल 'रेड'

Police crackdown on illegal sand mafias


अमळनेर ः अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू (Invalid sand) वाहतूक करणारे 7 ट्रॅक्टर ( Tractor) ट्रॉली सह पकडण्यात आले असून पोना दीपक माळी यांच्या फिर्यादीवरून संशयित चालक व मालक यांच्या विरुद्ध भादवि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed crime) करण्यात आला आहे.यावेळी एकूण 50 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना (police) यश आले आहे. (police crackdown illegal sand mafias)

हेही वाचा: जळगाव शहरात सक्रिय रुग्ण हजाराच्या आत..पण मृत्यूने चिंता कामय

हिंगोने शिवारातील बोरी नदीच्या पात्रातून अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना प्राप्त झाल्याने त्यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नियोजनाखाली पोलीस पथकाने अवैध रेती वाहतुकदारांवर कारवाई केली.आठवड्यात केलेली सलग दुसरी मोठी कारवाई आहे,मागील आठवड्यात 7 डपंर व 1 जेसिबी पोलीस विभागाने तापी नदीच्या पात्रातून पकडले होते.


सिनेस्टाइल छापा
अवैध वाळू वाहतूक करणारे वाळूमाफिया जागोजागी पहारेकरी (वॉचर) ठेऊन रात्रीचा पहारा देत असतात,जेणेकरून महसूल किंवा पोलीस पथकाचा सुगावा लागताच ते पथक नदीपात्रात येण्याआधीच रेती माफिया तेथून गायब होतात.परंतु पोलीस विभागाने रेती माफियांवर सर्जिकल स्टाईक करून धडक कारवाई केली.पो.हे.कॉ.दीपक वसावे,संजय पाटील,दीपक माळी,रवी पाटील,सुनील पाटील यांच्या पथकाने एका ट्रॅक्टर मध्ये बसून रेती भरण्यासाठी जात आहोत असे वॉचरला भासवुन सकाळी 5 वाजता अचानक छापा टाकून गौण खनिज अवैध रित्या वाहनात भरतांना संशयितांना पकडण्यात पथकाला यश आले.सर्वसामान्य नागरिकांनी अवैध धंद्यांवरील कारवाईचे स्वागत केले आहे.

loading image
go to top