इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो; बळीराजा लोकोत्सव ! 

उमेश काटे
Tuesday, 17 November 2020

. ‘इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो' या घोषणांनी बळी राजाचे स्मरण करण्याची परंपरा अमळनेरला कायम ठेवली आहे. 

अमळनेर  : येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजा पूजन करण्यात आले. ‘इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो' या घोषणांनी बळी राजाचे स्मरण करण्याची परंपरा अमळनेरला कायम ठेवली आहे. 

वाचा- मामाच्या घरी भाऊबीजला भाचा आला आणि शेततळ्यात जीव गमावून बसला -

दरवर्षी निघणारी बळीराजाची भव्य मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली होती. मात्र, शहरातील बळीराजा स्मारक येथे बळीराजा लोकोत्सव समितीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमत बळीराजाचे पूजन केले. याप्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. तर उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर पाटील, वसुंधरा लांडगे, नगरसेवक श्याम पाटिल, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रा. लिलाधर पाटिल, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, विनोद कदम, प्रवीण पाटील, नगरसेवक श्याम पाटील, विवेक पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, माधुरी पाटील, सयाजीराव पाटील, प्रा. विजय गाढे, दिलीप पाटील, कैलास पाटील, आर. बी. पाटील, प्रशांत निकम, एस. एन. पाटील, दशरथ लांडगे, ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंतराव पाटील, गहिननाथ पाटील, महेश पाटील, आबा चौधरी, महेश चौधरी, गौतम बिऱ्हाडे, भोसले बाबा, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदींनी पुष्प अर्पण करून बळीराजाचे स्मरण केले. 

शिरूड नाका परिसर येथेही सालाबादप्रमाणे बळीराजा प्रतिमेचे पूजन स्थानिक राहिवाशांनी केले. आमदार अनिल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जय अंबे मित्रमंडळातर्फे पूजन करण्यात आले. मुडी येथे बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन प्रगतिशील ज्येष्ठ शेतकरी हिंमतराव पाटील यांनी केले. कार्यक्रम अध्यक्षपदी भानुदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य उदय सोनवणे, नारायण पाटील, धुळे ग्राहक मंचचे अध्यक्ष डॉ. योगेश सूर्यवंशी, विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, महेंद्र पाटील, गुणवंत पाटील, गुलाबराव पाटील, देविदास पाटिल आदी उपस्थित होते.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner Pray for a good day for the farmers in Baliraja Lok Utsav