esakal | लेकिला वाचविण्यासाठी मातेचे धाडस..पण नदीपात्रातच तिने सोडला श्वास
sakal

बोलून बातमी शोधा

Bori River Flood

लेकिला वाचविण्यासाठी मातेचे धाडस..पण नदीपात्रातच तिने सोडला श्वास

sakal_logo
By
प्रा. हिरालाल पाटील

कळमसरे (ता.अमळनेर) : गेल्या चार-पाच दिवसापासून तामसवाडी धरणाचे (Tamaswadi Dam) संपूर्ण (15दरवाजे) काही क्षमतेने उघडण्यात आले आहेत. परिणामी नदीकाठावरील (Bori River Flood) सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा (Village Alert) देण्यात आला आहे. पंरतु असे असले तरी आजही काही गावे अशी आहेत की त्या ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली तर शर्तीचे प्रयत्न देखील पोल ठरतात. असच काहीसे अमळनेर तालुक्यातील सात्री येथील 13 वर्षीयआरुषीच्या बाबतीत गावकरी व तालुक्याला प्रत्येयास आले.

हेही वाचा: वाढदिवसाला घडले विपरीत..बसाली धबधब्यात जळगावचे दोन तरुण बुडाले

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सात्री येथील आरुषी सुरेश भिल (वय-वर्ष 13) दोन दिवसापासून तापाने फनफनत होती. बोरी नदीला पूर आल्याने साहजिकच तिला घेऊन तिचा कुटुंबाला नदी ओलांडून जाणे जीवावर बेतनार. बोरी नदीला जास्त पाणी असल्याने मुलीला दवाखान्यात नेता आले नाही. तर, डॉक्टरांना देखील गावात येणे शक्य नाही. मंगळवारी सकाळी आरुषी अस्वस्थ वाटू लागले, अशातच अधिक ताप वाढल्याने नदी काठावर आणीत गावकऱ्यांच्या मदतीने धाडस केले. तिला खाटेवर बसवून नदी ओलांडून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे म्हणून प्रयत्न करीत असतानाच तिला झटका आला आणि तेथेच तिचा मृत्यू झाला. लेक वाचावी म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून, चार-पाच जणांच्या साहायाने टायरच्या ट्यूब व खाटेचा आधाराने नदी पार करीत रुग्णालय गाठले. मात्र दुर्दैव !डॉक्टरांनी तपासले असता तिला मृत घोषित केले.

हेही वाचा: तोंडापूर मध्यम प्रकल्प ओहर फ्लो; पाय घसरून तरुण बेपत्ता

गावकऱ्यांचा संताप..
दरम्यान अमळनेर तालुक्यातील सात्री हे निम्न तापी प्रकल्पात पुनर्वसित गाव आहे.आठ वर्षांपासून या गावाचे पुनवर्सन चे काम रखडलेल्या स्वरूपात आहे. गेल्या आठवड्यात अप्पर जिल्हाधिकारी,पुनर्वसन अधिकारी यांनी या गावास भेट दिली होती.प्रामुख्याने,यावेळी येथील माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी पुढील दूरदृष्टी चा प्रत्येय बोलून दाखवला होता. मात्र निर्गगठ्ठ प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. म्हणुनच आज ही वेळ आली आहे; असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


अन..आरुषीचे प्रेत प्रांत कार्यालयात
उपचाराविना आरुषीने रसत्यातच दम तोडल्याने संतप्त ग्रामस्थानी आरुषीचे शवविच्छेदन झालेले प्रेत प्रांत कार्यालयात आनले.याप्रसंगी निगरगठ शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाचा चुकीच्या धोरनामुळे अजुन किती जनांचा जीव घ्याल असा संतप्त सवाल यावेळी येथील पुनर्वासन समिती प्रमुख महेंद्र बोरसे यानी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना केला.यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ ही उपस्थित होते. यावेळी भरपावसात मृतदेह प्रांत कार्यालयात , प्रांत अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार यांना पुनर्वसन समितीचे सदस्य महेंद्र बोरसे यांनी जबाबदार प्रशासना विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

loading image
go to top