esakal | तोंडापूर मध्यम प्रकल्प ओहर फ्लो; पाय घसरून तरुण बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Kang River Flood

तोंडापूर मध्यम प्रकल्प ओहर फ्लो; पाय घसरून तरुण बेपत्ता

sakal_logo
By
सतिश बिऱ्हाडे

तोंडापूर : (ता. जामनेर) तोंडापूर सह परिसरात काल रात्री पासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तोंडापूर मध्यम प्रकल्प ओहरफ्लो (Tondapur Dam) झाला आहे. धरण ओहरफ्लो झाल्याने कांग नदीला आलेल्या पुरामुळे (Kang River Flood) दोन्ही गावाचा व फत्तेपूर कडे जाणाऱ्याचा सकाळ पासून दुपार पर्यंत संपर्क तुटला होता.

हेही वाचा: जगाच्या एक चतुर्थांश अंध व्यक्ती भारतात- डॉ.धर्मेंद्र पाटील

कांग नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या दोन्ही काठावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. धरण परिसरात नदीच्या काठावर पुर पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांचा पाय घसरल्यामुळे नदीच्या प्रवाहात वाहल्याने दोन पैकी एक जण बेपत्ता झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली आहे. शेख मुशिर शेख जहिर (वय ३२) असे तरुणांचे नाव असून त्याना दोन मुली एक मुलगा व पत्नी आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: वाढदिवसाला घडले विपरीत..बसाली धबधब्यात जळगावचे दोन तरुण बुडाले

सायंकाळ पर्यंत तरुणांचा शोध कार्य सुरू होते घटनेची माहिती तहसीलदार जामनेर यांना मिळताच मडळ अधिकारी आर. के. चौधरी. व तलाठी शिवाजी काळे पोलिस हवालदार देशमुख यानी नदीच्या काठावर येवून माहिती घेतली व शोधकार्यात गावकऱ्यांना सहकार्य केले मात्र पाऊस सतत पडत असल्याने अडथळा येत होता. तोंडापूर येथील कांग नदीला आलेल्या पुरामुळे तोंडापूर सह फत्तेपूर जाणाऱ्या जामनेर जाणाऱ्या नदीला पुर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती गावकऱ्यांनचा संपर्क तुडला होता

loading image
go to top