esakal | घामाच्या पैश्यासाठी "त्या दोघे" कोरोना योद्धा चे हेलपाटे !
sakal

बोलून बातमी शोधा

घामाच्या पैश्यासाठी "त्या दोघे" कोरोना योद्धा चे हेलपाटे !

घरात दोन महिन्यापासून पगार नाही, उपासमार होती त्यामुळे त्यानी 17 जुलैला एक दिवस काम बंद केले. कोविड सेन्टरचे पाणी व दिवे एक दिवस बंद झाले.

घामाच्या पैश्यासाठी "त्या दोघे" कोरोना योद्धा चे हेलपाटे !

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर : एकीकडे शासनाच्या विविध कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात येतो.. त्यांना अनेक पुरस्कार देण्यात येतात. मात्र कमी कालावधीसाठी मानधनावर नियुक्त असणाऱ्या येथील "त्या दोन" सेवेकरी कोरोना योद्धाचे काय ? ज्यांनी दोन महिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोणताही प्रकारचा विमा हमी नसताना, मानव सेवा केली त्यांना न्याय कोण देणार? असा सवाल सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे. 

वाचा- जळगाव जिल्ह्यात ७८१ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर !

येथील प्रविण डंबेलकर व प्रसाद चौधरी हे प्रताप महाविद्यालयात रात्र पाळीला गेल्या 14 वर्षा पासून रोजंदारीने काम करीत होते. लॉकडाऊन मुळे महाविद्यालय बंद झाले. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर मोठे संकट उभे राहिले. आर्थिक परिस्थिती बिकट असताना व परिवाराची जबाबदारी असल्यामुळे ते दोघे कोणतेही संकट झेलण्यासाठी तयार होते. अशा वेळी प्रताप महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू झाले. येथील परिसराची संपूर्ण माहिती या दोघांना असल्यामुळे प्रांतधिकारी सीमा अहिरे यांच्याकडून
केअर सेन्टर ला पाणी पुरवठा, वीज,स्वच्छ पाणी ठेवण्याची जबाबदारी 11 मे रोजी देण्यात आली. शासकीय पत्र असल्यामुळे ते दोघेही कामाला लागले, त्यांचा स्वभाव सेवा भावी वृत्तीचा असल्याने एक महिना काम केले. महिन्याचा पगार मिळन्यासाठी दोघांनी प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य कडे गळ घातली.

प्रांताधिकाऱयाकडे धाव

मात्र तेथून निराशा झाली. ते कोविड केयरला काम करीत असल्यामुळे त्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे धाव घेतली. त्यानीही बांधकाम विभागाचे श्री.राजपूत यांच्याकडे पाठवले, त्यांना वारंवार भेटण्यास गेले असता त्यांची भेट झाली नाही.

पगार नाही म्हणून उपासमारीची वेळ

 67 दिवस उलटले तरी दोघांचे काम सुरुच होते. कोविड सेंटरला काम करत असल्यामुळे बाहेर काम कोणी देत नव्हते, घरात दोन महिन्यापासून पगार नाही, उपासमार होती त्यामुळे त्यानी 17 जुलैला एक दिवस काम बंद केले. कोविड सेन्टरचे पाणी व दिवे एक दिवस बंद झाले त्यामुळे प्रशासन जागे झाले दुसऱ्या दिवशी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कडून त्यांना 5 हजार व BMC कडून 15 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. पुढील 28 दिवस पुन्हा त्यांच्यावर कामाची जबाबदारी देण्यात आली.

हातात पडले सेवा खंडतीचे पत्र

मात्र त्यानंतर 3 ऑगस्टला सेवा खंडित करण्याचे पत्र महाविद्यालयात देण्यात आले. पण हे पत्र त्यांना 33 दिवस उशिरा देण्यात आले, यामागील कारण काय ? असा ही प्रश्न त्यांना पडला आहे. या दोघांनी 95 दिवस काम केले. 350 रुपये प्रति दिवस 33 हजार रुपयाची रक्कम पगार स्वरूपात मिळायला हवी, पण त्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात आले. उर्वरित 23 हजार 250 रक्कम मिळण्यासाठी त्यांना हेलपाटे घालावे लागत आहे. त्यांना त्यांच्या श्रमाचा पैसा मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

आवर्जून वाचा- महाजनांच्या बालेकिल्यात भाजपला सुरूंग; भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत !
 
 

धाडसी वृत्तीचे त्यांचे कार्य...

कोरोना काळात प्रविण डंबेलकर व प्रसाद चौधरी या दोघांनी धाडसी वृत्तीचे कार्य केले. ते सर्प मित्र असल्याने कोविड केयर सेंटर ला विषारी मणियार जातीचा सर्पही पकडला होता. काही त्रासलेले रुग्णानी अनेक प्रकारचे नुकसान केले. या सर्व बाबी त्यांनी पुर्वरत केल्यामुळे वापरास सोय झाली. गरजू रुग्णांना वस्तू व लहान बालकांना खाद्यपदार्थ पुरविले. डॉक्टर , नर्स , पोलीस व होमगार्डस यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले. श्रीमंत प्रताप शेठजी व यांच्या श्रीमती असे दोन पुतळे आवारात आहेत यांची नित्य पूजा व साफसफाई यांनी केली. इतरांना संसर्ग होवू नये यासाठी सर्वच जण काळजी घेत होते मात्र या दोघांना फक्त तीनच पिपई किट देण्यात आले होते, हे विशेष!
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image