शेतकऱ्यांना आता..अनूदानावर मिळणार बियाणे !

एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाव्दारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे
seeds
seedsseeds
Updated on


जळगाव ः सध्या शेतकरीराजा (farmer) आगामी खरिपाची तयार करण्यात व्यस्त आहे.
यामुळे शासनाने (Government) शेतकऱ्यांना अनूदानावर (Grant) बियाणे (Seeds) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाच्या ‘महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना ’या शीर्षकातंर्गत विविध कृषि विषयक योजनांचा (Agricultural plan) लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

(farmers farming get seeds subsidy available)

seeds
दररोज काही झालं की टीका करणे चुकीचे..गडकरींचे म्हणणे योग्य !

या सुविधेतंर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाव्दारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी १५ मेपर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक आहे.

seeds
भाजप नेत्यांच्या धमक्यांना भुजबळ आणि मी घाबरत नाही !

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा, शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्राच्या माध्यमातून या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. वैयक्तीक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधारक्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com