esakal | गिरणा धरणाने शंभरीची केली 'हॅट्रीक'; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Girna Dam

गिरणा धरणाने शंभरीची केली 'हॅट्रीक'; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव : गेल्या काही दिवसापासून गिरणा धरण (Girna Dam) पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस (Heavy Rain) होत असल्याने गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा येत होता. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी गिरणा धरणाने आज सकाळी सात वाजता शंभरी गाठली. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये (Farmers Happy) आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून धरणातून सध्या 7500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ' ला माहिती दिली.

हेही वाचा: कारवाईच्या अफवेचे खडसेंकडूनच ‘पोस्ट मार्टम’

गिरणा धरणाने सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रातील धरणातुन मोठ्याप्रमाणात पाणीसाठा आल्याने रात्रीतुन 6 टक्के पाण्याचा साठा धरणात वाढला. सात वाजता सुरवातीला चार गेट एका फुटाने वर करण्यात आले. यातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होत होता. मात्र पुन्हा धरणात पाण्याचा प्रवाह वाढल्याने सात दरवाजे उघडून साडेसात हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ज गिरणा नदीत सुरु करण्यात आला.

Girna Dam

Girna Dam

हेही वाचा: जळगाव मनपाः‘तो’ आदेश रद्दसाठी ‘वर्गणी’ची वसुली होणार!

गिरणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

आज सकाळ पासून गिरणा नदी पात्रात सुमारे साडे सतरा हजार क्युसेकने पाण्याचा विर्सग होत आहे. त्यामुळे गिरणा नदीत पाण्याचा मोठा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस.आर.पाटील यांनी केले आहे.

loading image
go to top