esakal | जळगाव मनपाः‘तो’ आदेश रद्दसाठी ‘वर्गणी’ची वसुली होणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

जळगाव मनपाः‘तो’ आदेश रद्दसाठी ‘वर्गणी’ची वसुली होणार!

sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव : महापालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) उड्डाण पदोन्नती रद्द करण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाकडून (Government Urban Development Department) आदेश काढून आणत आता तो रद्द करण्याच्या नावाखाली काही अधिकारी, पदाधिकारी एकवटले असून, त्यासाठी संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात वर्गणी वसुली केली जाण्याची शक्यता आहे. त्याची जबाबदारी एका निवृत्त अभियंत्याकडे (Retired Engineer) सोपविल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: मेहरूण तलाव शंभर टक्के भरला..सांडव्यावरून पाणी ‘ओव्हरफ्लो’


खरेतर जळगाव पालिका असताना २५-३० वर्षांपूर्वीच्या या उड्डाण पदोन्नतीच्या प्रकरणात काही अधिकारी-कर्मचारी निवृत्तही झाले आहेत. असे असताना शासनाने अचानक त्यावर कारवाईची प्रक्रिया करत सर्व उड्डाण पदोन्नतीच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश काढले.


‘सकाळ’च्या वृत्ताने खळबळ
अशा स्वरूपाचे आदेश काढण्यामागे कोणती तरी यंत्रणा कार्यरत असल्याचे वृत्त बुधवारी (ता. २९) ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली, तर पदाधिकारी व नगरसेवकही त्याबाबत दबक्या आवाजात चर्चा करीत होते.

हेही वाचा: आता तृतीयपंथीयांनी मिळणार ओळखपत्र; पोर्टल सुरू!

‘वर्गणी’ची जमवाजमव शक्य
उड्डाण पदोन्नती घेणाऱ्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये या आदेशाने धास्ती पसरली आहे. मात्र, हा आदेश शासनाकडूनच रद्द करून आणू, असे आश्‍वासन काही अधिकारी, पदाधिकारी या कर्मचाऱ्यांना देत आहेत. त्यामुळे नियुक्ती रद्द होणे व शास्तीची कारवाई रोखण्यासाठी त्यांच्याकडून ‘वर्गणी’ घेतली जाण्याची व त्यादृष्टीने तयारी सुरू झाल्याची शक्यता आहे.

हेही वाचा: जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे तातडीने बदला- जिल्हाधिकारी

निवृत्त अभियंता सक्रिय
मुळातच मनपातून निवृत्त झालेले काही अधिकारी, अभियंता व कर्मचारीही काही नगरसेवक, भूमाफियांसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे, तर काही जण मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ‘सेटिंग’चे काम करीत असल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. अशाच एका अभियंत्याकडे उड्डाण पदोन्नती प्रकरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून ‘वर्गणी’ जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे हे प्रकरण आणखीच गंभीर होत आहे.

loading image
go to top