बलून बंधाऱ्यांबाबत केंद्रस्तरावर हिरावा झेंडा...लवकरच लागणारी प्रश्‍न निकाली 

सुधाकर पाटील
Friday, 21 August 2020

गेल्या पंधरवड्यात खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांना निती आयोगाकडुन निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी लवकरच जलशक्ती विभाग व निती आयोगाची एकत्रित बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते.

भडगाव: गेल्या पंधरवड्यात गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यासंदर्भात खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली होती. आज त्यांनी निती आयोगाचे अभिनव मिश्रा यांची भेट घेतली. त्यांनी बलूनचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात 'पीएमओ'कडे पाठविण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बलूनचा प्रश्न लवकरच मार्गी लागल्याचे चिन्हे आहेत. 

हेही वाचा - स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांची उत्तम कामगिरी

गेल्या पंधरवड्यात खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांना निती आयोगाकडुन निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी लवकरच जलशक्ती विभाग व निती आयोगाची एकत्रित बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते. त्या अनुशंगाने आज खासदार उन्मेष पाटील यांनी निती आयोगाचे सल्लागार अभिनव मिश्रा यांची भेट घेतली. अर्धा तास त्यांची बलून बंधाऱ्यासंदर्भात चर्चा झाली. त्यात या बंधाऱ्यांना जमीन अधिग्रहीत करणे नसल्याने या संदर्भातील प्रस्ताव पुढच्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.. 

सात हजार हेक्‍टर सिंचनाचा लाभ 
बलून बंधाऱ्यांना निती आयोगाच्या "डीमांड 40' अंतर्गत निधी मिळणार आहे. या बंधाऱ्यामुळे निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. तर 7 हजार हेक्‍टरवर सिंचनाचा लाभ होणार आहे. आजच्या भेटीमुळे बलून बंधाऱ्यासंदर्भात गिरणा पटट्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

वरखेडे- लोंढे बॅरेजचा प्रश्न निकाली निघाला आहे. आता गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांना निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. या बंधाऱ्याना केंद्राकडून लवकरच निधी मिळून प्रश्न ही निकाली निघेल. 
- उन्मेष पाटील, खासदार जळगाव 

संपादन : राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon girna river balun bandhara pm office next week sollution