गिरणा धरणात ६५ टक्के साठा 

girna river dam
girna river dam

भडगाव : गिरणा धरणाच्या जलसाठ्यात यंदाच्या पावसाळ्यात ३४ टक्के वाढ झाली असून, पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी दोन धरणे ‘ओव्हरफ्लो’, तर तीन धरणांत ८० टक्क्यांवर साठा असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सद्य:स्थितीला धरणात ६५ टक्के साठा असून, शंभरी गाठण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. 

‘गिरणा’त ३४ टक्के वाढ 
निम्म्या जळगाव जिल्ह्याचा शेती व पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या गिरणा धरणात गेल्या वर्षी २३ ऑगस्टला ७८ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा १४ टक्के अधिक जलसाठा आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी दोन धरणे शंभर टक्के भरली. तर तीन धरणांतही ८० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. त्यामुळे त्या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. ठेंगाळा बंधाऱ्यातून तीन हजार ४४४ क्यूसेकने धरणात आवक सुरू असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे एस. आर. पाटील यांनी सांगितले. मन्याड धरणातून गिरणापात्रात पाणी येत असल्याने नदी वाहत आहे. 


गिरणा धरणावर अंवलबून असलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) 

तालुका.............अवलंबून क्षेत्र 
चाळीसगाव..........९६३ 
भडगाव.............१०,५६३ 
एरंडोल...............१०,३५४ 
धरणगाव.............२२,१८७ 
अमळनेर..............१०,२५८ 
पारोळा................२,८८४ 
मालेगाव..............१,००० 
धुळे.....................१७०० 

पाणलोट क्षेत्रातील धरणाची स्थिती व सुरू असलेला विसर्ग धरण............धरणाची .....विसर्ग 
- चणकापूर.......८१........१४८९ 
- पुनंद.............८८.........९४० 
- केळझर........१००........१९८ 
- हरणबारी ......१००.......८४६ 
- नाग्यासाक्या.....८६.४०....०० 
 
गिरणा धरण दृष्टिक्षेपात 
- धरणाची क्षमता...२१,५०० दशलक्ष घनफूट 
- धरणाचा मृतसाठा..३,००० दशलक्ष घनफूट 
- उपयुक्त जलसाठा...१८,५०० दशलक्ष घनफूट 
- सद्य:स्थितीला उपयुक्त जलसाठा.. दशलक्ष घनफूट..११,९५०- 
- एकून लाभक्षेत्र... ६९,००० हेक्टर 
- जळगाव जिल्ह्यातील एकूण लाभक्षेत्र....५७,२०९ हेक्टर 
- जलसिंचनाचे फायदे मिळणारे तालुक्याची संख्या...०८ 
- धरणावर अवलंबून पाणीपुरवठा योजना...१५८ ग्रामीण व चार पालिकेच्या योजना 
 
संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com