esakal | भडगाव येथील जवान लेह-लडाखमध्ये ‘हुतात्मा’
sakal

बोलून बातमी शोधा

भडगाव येथील जवान लेह-लडाखमध्ये ‘हुतात्मा’

भडगाव येथील जवान लेह-लडाखमध्ये ‘हुतात्मा’

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भडगाव : भारतीय सैन्यदलातील (Indian Army) जवान नीलेश रामभाऊ सोनवणे (वय ३०) हे लेह-लडाखमध्ये (Leh-Ladakh) कर्तव्यावर असताना हुतात्मा (Martyr) झाले. येथील टोणगाव भागातील मूळ रहिवासी असून, या घटनेमुळे भडगाव शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, जवानाचे पार्थिव सोमवारी (ता.१२) भडगावात येण्याची शक्यता आहे. (bhadgaon indian army soldier martyr leh ladakh)

हेही वाचा: जिल्हा रुग्णालयात महिला, युवकावर 'बायोप्सी' ची शस्त्रक्रिया!

शहरातील टोणगाव भागातील नीलेश सोनवणे हे भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. नीलेश सोनवणे यांना शनिवारी (ता. १०) काश्मिरमधील लेह-लडाख येथे सेवा बजावत असताना वीरगती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सेवेवर असताना जवान नीलेश सोनवणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु याबाबत अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकला नाही. जवानाचे पार्थिव लेह येथून विमानाने दिल्ली येथे आणले जाणार आहे. तेथून नाशिक किंवा औरंगाबाद येथे आणले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत पार्थिव भडगावला पोचेल. त्यानंतर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. नीलेश सोनवणे २०१० पासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. जवान हुतात्मा झाल्याची बातमी शहरात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई व पाच भाऊ असा परिवार आहे. त्यांचे दोन भाऊ पोलिस सेवेत कार्यरत आहेत.

हेही वाचा: खचू नका..सरकार शेतकऱ्यांसोबत-दादा भुसे


एकनाथ शिंदेंकडून सांत्वन
जवान हुतात्मा झाल्याच्या माहिती मिळताच जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

loading image