एसआरपी केंद्र वरणगावला की कुडसगावला ?...रोहीत पवारांनी केली जागेची पाहणी !

srpf
srpf

भडगाव : जळगाव जिल्ह्यात मंजूर असलेले राज्य राखीव पोलिस  प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुडसगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली राजकीय ताकद वापरत हे केंद्र पुन्हा जळगाव जिल्ह्यातच ठेवण्यात यश आल्याचे सांगितले. मात्र काल कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्य राखीव दलाच्या वरिष्ठ अधिकार्या समवेत कुडसगाव येथील संभाव्य जागेची पाहणी केल्याची फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र नेमके जळगाव ला की नगर ला? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 


1994  पासून जळगाव जिल्ह्यात वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत मागणी आहे. त्यानंतर सातत्याने हा प्रश्न शासनदरबारी रेंगाळत राहीला. युती शासनाच्या काळात 2019 मधे पोलिस प्रशिक्षण केंद्रा ऐवजी राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 19 स्थापन करण्यात तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर महाविकास आघाडी चे  सरकार स्थापन झाले. त्यांनी हे प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यातील कुडसगाव येथे स्थलांतरित करण्याचे आदेश काढले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राड उठली. त्यानंतर 9 जुलैला हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जळगाव जिल्ह्यातील वरणगाव-हतनुर येथे स्थापन करण्याबाबत पोलिस उच्चस्तरीय समीतीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र काल कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एसआरपी च्या अधिकार्या समवेत नियोजित कुडसगाव येथील प्रशिक्षण केंद्राच्या जागेची पाहणी केली. त्यासंदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊटंवर पोस्ट ही केली. त्यामुळे नेमके एसआरपी चे प्रशिक्षण केंद्र कुठे होणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

..मग जामखेडला जागेची पाहणी कशी काय? 

9  जुलै ला उच्चस्तरीय बैठकीत जामखेड येथे हलविण्यात आलेले राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जळगाव जिल्ह्यातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तर मग काल नियोजित असलेर्या जामखेड येथील कुडसगाव येथील  जागेची एसआरपी च्या अधिकार्यानी पाहणी कशी काय केली? पाहणी केल्याच्या संदर्भातील आमदार रोहित पवार यांनी फेसबुक अकाऊटंवर पोस्ट केली आहे. त्यामुळे  पुन्हा एकदा प्रशिक्षण केंद्रासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. 

केंद्र कुठे होणार? 

राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रावरून नगर आणि जळगाव जिल्ह्यात सध्या रस्सीखेच सुरू आहे. या विषयावरून गेल्या आठवड्यात राजकीय घमासान सुरू होते. मात्र  प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यातच होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वातावरण शांत झाले होते. पण काल आमदार रोहित पवारांनी अधिकार्या समवेत जामखेडमधील कुडसगाव येथील नियोजित जागेची पाहणी केल्याने हा प्रश्न तापण्याची चिन्हे आहे. पण हे केंद्र सद्यस्थीतीला कुठे होणार? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत दिसत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com