
शहरातील मोठे व्यापारी, आडत दुकानदार, किराणा दुकानदार, बूट चप्पलचे दुकान, भाजीपाला मार्केट, ज्वेलर्स दुकान बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला येथील व्यापारी मंडळींनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.
पारोळा (जळगाव) : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित न जोपासता विधेयकाला बळ दिले. याबाबत संपूर्ण देशात आज भारत बंदला प्रतिसाद मिळाला असुन पारोळ्यात देखील महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली होती.
पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील, माजी पालकमंत्री डाँ. सतीष पाटील, माजी खासदार अँड वसंतराव मोरे व आय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी शेतकरी हितासाठी रस्त्यावर येत केंद्राच्या निषेध करण्यात आला. याप्रारंभी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी एकत्रित येत अभिवादन करुन बंदबाबत सर्वांना आवाहन केले.
व्यापाऱ्यांनीही पाळला बंद
शहरातील मोठे व्यापारी, आडत दुकानदार, किराणा दुकानदार, बूट चप्पलचे दुकान, भाजीपाला मार्केट, ज्वेलर्स दुकान बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला येथील व्यापारी मंडळींनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. यावेळी आय काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. संजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, उपप्रमूख भूषण भोई, मार्केट कमिटीचे संचालक मधुकर पाटील, जी. प. सदस्य रोहन पाटील, माजी नगरसेवक रमेश महाजन, युवासेना प्रमुख आबा महाजन, सावंत शिंपी, आबा पाटील आदी होते. व्यापारी मंडळींनी शंभर टक्के प्रतिसाद देत दुकान बंद ठेवलीत. महाविकास आघाडीतर्फे सर्व व्यापारी आणि छोटे गाडीवाले यांनी देखील बद ठेवला.
संपादन ः राजेश सोनवणे