लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणे पडले महागात...775 वाहनांवर कारवाई

लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणे पडले महागात...775 वाहनांवर कारवाई

भुसावळ : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 7 ते 13 जुलै या काळात लाँकडाऊन शहरात लागू करण्यात आले आहे. याची आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असून गेल्या दोन दिवसात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 775 वाहनांवर बाजारपेठ व शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून जळगाव नाका, यावल नाका, वरणगाव नाका, जामनेर रोड या सह शहराच्या प्रत्येक मुख्य चौकांमध्ये पोलिस प्रशासनाकडून कडक पहारा लावण्यात आलेला आहे. मात्र तरीही कारण नसताना विनाकारण शहरांमध्ये फिरणाऱ्या दुचाकी,तीनचाकी, व चार चाकी वाहन कारवाईस सामोरे जावे लागले, 7 रोजी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 181 तर बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 125 वाहनावर कारवाई करण्यात आली तर 8 रोजी तब्बल 321 शहर हद्दीत तर 148 बाजारपेठ हद्दीत वाहनांवर कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसात तब्बल 775 वाहनांना वर दंडात्मक स्वरूपात कारवाई करण्यात आली तसेच काही वाहनावर 188 नियमाप्रमाणे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.


नागरिक स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊ ला प्रतिसाद देत आहे मात्र काही नागरिक नाहक शहरांमध्ये हिंडतांना दिसत आहे .पोलीस प्रशासनातर्फे शहरांमध्ये कडक् पहारा ठेवण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी ठीक ठिकाणी असलेल्या बंदोबस्तावरील पोलिसांनाही संवाद साधला त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोंबे, रामकृष्ण कुंभार हे उपस्थित होते.


अमरदीप टॉकीज परिसर ,रजा टावर चौक ,मॉडन रोड, रेल्वे स्थानक रोड, मामाची टाँकीज रोड,शिवाजी नगर रोड ,अप्सरा चौक, डिस्को टाँवर चौक, बाजारपेठ, जामनेर रोड, अष्टभुजा चौक ,गांधी चौक, गांधी पुतळा याठिकाणी शुकशुकाट दिसून आला.
पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येईल येत असून नागरिकांनी विनाकारण मुळीच बाहेर निघू नये लाँकडांऊनचा तंतोतंत पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.  


संपादन-भूषण श्रीखंडे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com