esakal | सणासुदी घरात पाणी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप !
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदी घरात पाणी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप !

दर महिन्याला पाणीपुरवठ्याची समस्या कायम असून या महिन्यातही गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावात पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

सणासुदी घरात पाणी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप !

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : कंडारी (ता. भुसावळ) गावात सणासुदीत पाणीपुरवठा टप्पा आहे. यासह गावात नियमित साफसफाई होत नसल्याने अस्वच्छता वाढीस लागली असून, याबाबत वारंवार तक्रारी करून देखील ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून चावी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

आवश्य वाचा- शेतकऱ्यांचे पांढरे सोने मजुर अभावी शेतातच पडून ! 

कंडारी हे गाव तापी नदीच्या काठावर असूनही गावात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा खंडित असतो. दर महिन्याला पाणीपुरवठ्याची समस्या कायम असून या महिन्यातही गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावात पाणीपुरवठा खंडित झाला आहे. प्रत्येक वेळी जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची मोटर खराब होणे किंवा विद्युत तारा जळणे अशा बाबी होत असल्याने गावाचा पाणीपुरवठा टप्पा होत असतो. यास पर्यायी व्यवस्था नसल्याने आठवडाभर यंत्रणा दुरुस्त होईपर्यंत ग्रामस्थ पाणीपुरवठा पासून वंचित असतात. सध्या सणासुदीत ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाणी नाही म्हणून महिलांची नदीवर पायपीट

दिवाळी दसऱयाची धुणी-भांडी करण्यासाठी महिलांना तापी नदीवर धुणी भांडी घासण्यासाठी पायपीट करून जावे लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती असल्यामुळे गावातील समस्या आणखी बिकट झाली आहे.

वाचा- म्‍हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत जिंदाबादचा नारा : मंत्री गुलाबराव पाटील
 

इतर समस्यांकडे ही ग्रामपंचायतीची पाठ

गावात पाणी पुरवठा वैतरिक्नित इतर समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. यात नियमीत साफसफाई होत नसल्यामुळे गटारी तुंबल्या असून, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दृष्टीच पडत असून, अस्वच्छता वाढीस लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा विविध समस्यांमुळे ग्रामस्थांवर मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. याप्रसंगी सुरेंद्र सोनवणे, चंदन तायडे, सुनिल चौधरी यासह ग्रामस्थ उपस्थित होते.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे