लॉकडाउन जाहीर होताच भुसावळ बाजारपेठेत उडाली झुंबड !  ​

लॉकडाउन जाहीर होताच भुसावळ बाजारपेठेत उडाली झुंबड !   ​

भुसावळ : राज्यातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी बुधवारी (ता. १४) रात्री आठपासून पंधरा दिवसांसाठी राज्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठांमध्ये धाव घेतली. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. त्यामुळे भाजीबाजारसह सुपरमार्ट आणि किराणा मालाच्या दुकानांसमोर लांब रांगा लागल्या होत्या. 


गेल्यावर्षी मार्चमध्ये अचानक लॉकडाउन लावल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने घरातील अन्नधान्याचा साठा संपल्यानंतर बऱ्याच जणांवर उपासमारीची वेळ ओढवली. ही अडचण लक्षात घेऊन किराणा मालाची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली; परंतु अंतर नियमावलीच्या अंमलबजावणीमुळे दुकानांसमोर ताटकळत उभे रहावे लागले. रांग लावल्यानंतर उशिरापर्यंत नंबर लागत, अशी स्थिती होती. आता पुन्हा लॉकडाउन लावल्यास अशी बिकट वेळ ओढवू नये, यासाठी लॉकडाउनची घोषणा होताच नागरिकांनी बाजारपेठा गाठल्या. 

अनेक ठिकाणी वाद

शहरातील प्रत्येक किराणा दुकानासमोर बुधवारी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. घरात किराणा भरण्याच्या धडपडीत नागरिकांना अंतर नियमांचेही भान नव्हते. काही ठिकाणी रांगेत घुसखोरीवरून कडाक्याचे भांडण झाल्याचे प्रकारही घडले. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने काही भागातील बाजार बंद करण्याच्या सूचना पोलिसांना कराव्या लागल्या. 


सोशल डिस्टन्सिंगला हरताळ 
भाजीपाला मार्केटमध्ये तर सकाळपासूनच ग्राहकांची झुंबड उडाली होती. अरुंद गल्ल्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात असल्याने गर्दी नियंत्रित करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत होते. अंतर नियम पाळण्याच्या सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे केल्या जात होत्या. परंतु लॉकडाउनच्या भीतीने बाजारात उसळलेल्या गर्दीवर त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नव्हता. 

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com