esakal | लग्नाच्या अक्षदा पडणार..तोच हातात पडली दंडाची पावती !

बोलून बातमी शोधा

weding

लग्नाच्या अक्षदा पडणार..तोच हातात पडली दंडाची पावती !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : सध्या कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत लग्न समारंभास 25 जणांचे परवानगी दिली आहे. मात्र शहरात एकाच बग्गीतून दोन नवरदेवाची डीजे च्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही बाब पोलीस आणि पालिका प्रशासनास कळताच त्यांनी विवाहस्थळी धाव घेतली. वाल्मिक नगर भागात लग्न समारंभाचा सोहळा सुरू असतांना अचानक पोलीस व नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन लग्न समारंभाच्या अक्षदा पडण्यापूर्वी प्रशासनांने दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: भुसावळ पालिकेत खडसे गटाचा वरचष्मा, प्रमोद नेमाडे बिनविरोध

अधिक माहिती अशी की,सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्न समारंभाना 25 जणांची प्रशासनाने परवानगी दिली आहे. यानंतरही जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेशांचे उल्लंघन करीत भुसावळ शहरातील वाल्मिक नगर भागातील रहिवाशी गोपाळ ढोलपुरे यांच्या घरी दोन लग्न समारंभ सोहळा सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी व नगरपरिषदेचे अधिकारी यांना मिळताच घटनास्थळी पाहणी करण्याकरिता गेले असता, लग्न समारंभा ठिकाणी उपस्थितीतांची मोठ्या प्रमाणात जमाव असल्याने प्रशासनाने 20 हजार रुपयांचा दंड आकारून वसूल केला. तर बग्गीवाले मोहन चंदेले यांना प्रशासनाने 5 हजार रुपयांचा दंड ठेठावला. या लग्न समारंभासाठी आलेले डीजे मालक मात्र पसार झाला असून पोलीस व नगरपरिषद प्रशासन त्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हेही वाचा: जि.प.अध्यक्षांचे पतीसह स्पेशल लसीकरण ! आणि भाजप कार्यकर्त्यांचा घरचा आहेर

सदरची कारवाई आठवडे बाजारात करण्यात आली असून विना मास्क फिरणाऱ्या 25 जणांकडून 5,700 रुपये तर 7 दुकानदारांकडून 10 हजार 500 रुपये असे दिवसभरातून चार कारवाई करण्यात आल्या असून एकूण 37 हजार 200 रुपये आठवडे बाजार व लग्न समारंभाकडून वसूल करण्यात आले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे