esakal | रोगापेक्षा इलाज भंयकर..लसीकरण केंद्रावर धुमाकूळ !

बोलून बातमी शोधा

vaccination crowd
रोगापेक्षा इलाज भंयकर..लसीकरण केंद्रावर धुमाकूळ !
sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात मृत्यूदरही वाढल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असल्याने लसीकरणाला नागरिकांची गर्दी होत असून, लांबच लांब रांगा लागत आहे. 1 तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. परंतु शहरात आत्ताच लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. अनेक केंद्रावर नागरिकांची भांडण होताना बघायला मिळत आहे. शहरातील दत्त नगर केंद्रावर संतप्त नागरिकांनी केंद्रात घुसून धुमाकूळ घातला, यात दोन कर्मचारी जखमी झाले. जवळपास दोन तास चाललेला गोंधळ पांगविण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

हेही वाचा: आजारी व्यक्तींनी घरी थांबू नका..वेळीच तपासणी करा !

शहरातील दत्त नगर पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर नागरिकांमध्ये भांडणाचे मोठे प्रकार दिसून आले. याखेरीज 1200 लशीचे डोस उपलब्ध झाले आहेत. असं असताना नागरिक मात्र हजारोच्या संख्येने येत आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त लोकं आल्याने एकच गोंधळ उडालेला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांना सांभाळता सांभाळता त्रेधातिरपट उडत आहे. अनेक केंद्रांवर मर्यादित साठा उपलब्ध असल्यामुळे हजारो लोकांना माघारी परतावे लागले होते. मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर आज आपल्याला लसीकरण करता येईल, या उद्देशाने नागरिक वेगवेगळ्या केंद्रांवर गेले होते. पालिकेच्या केंद्रांवर मोजकाच साठा उपलब्ध असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.

दिवसभरात 1200 जणांचे लसीकरण

भुसावळ तालुक्यातील 12 लसीकरण केंद्रांसाठी एकूण 1200 लसी उपलब्ध झाल्या होत्या. या लसीचे प्रत्येकी 100 डोस प्रमाणे केंद्रांवर वाटप करण्यात आले. यामध्ये भुसावळ शहरातील यावल रोड केंद्र 100, दत्तनगर 100, खडका रोड 150, बद्री प्लॉट 100, महात्मा फुले रुग्णालय 100 तर तालुक्यातील कठोरा, किन्ही, पिंपळगाव आणि वराडसीम येथे लसीकरण केंद्र असून, ग्रामीण रुग्णालयात 80 तर आरोग्य उपकेंद्रांमध्ये 30 लसी देण्यात आल्या होत्या. आज दिवसभरात लसींचा पूर्ण साठा संपला असून, उद्या संध्याकाळपर्यंत नवीन साठा उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: VIDEO:धक्कादायक : परिचारिकांनी लशींची केली चोरी; रंगेहाथ नागरिकांनी पकडले !

दत्तनगर केंद्रावर धुमाकूळ

वरणगाव रोड परिसरातील दत्तनगर केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांची गर्दी वाढल्याने, लोकांमध्ये आपसात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर सर्व लोकांनी दवाखान्यात घुसून एकच गदारोळ केला. तसेच दरवाज्याची आदळआपट केली, त्यात सुरवाडे नामक कर्मचारी यांच्या हाताला लागून दुखापत झाली आहे. तसेच एका आशा वर्करच्या हाताला सुद्धा मार लागला. यामुळे कर्मचारी यानी 2 तास काम बंद ठेवलं. वाद सुरु असतांना येथिल कर्मचारी यांनी चंद्रशेखर पाटील यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी लागलीच माजी नगरसेवक राजेंद्र आवटे व डॉ. नि तु . पाटील यांना फोन करून सांगितले. राजेंद्र आवटे यांनी आमदार संजय सावकारे यांच्याशी बोलून बंदोबस्त मागवून गर्दी पांगवली. हा गोंधळ जवळजवळ 2 तास सुरु होता.

हेही वाचा: वाळू माफियांचे धाबे दणाणले; इन्स्पेक्टर उतरले नदीपात्रात !

सध्या कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता, लशींची मागणी वाढली आहे. अगोदर आम्ही फोन लावून नागरिकांना बोलवत होतो. तरीदेखील फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता लस घेण्यासाठी गर्दी वाढत असून, त्या तुलनेत लसींचा साठा उपलब्ध होऊ शकत नाही. याचा अतिरिक्त ताण यंत्रणेवर पडत आहे.

- डॉ. तैसीफ खान, लसीकरण प्रमुख.

संपादन- भूषण श्रीखंडे