दिपनगर विद्युत केंद्रात स्फोट; कर्मचारी भाजला

dipnagar viduat center
dipnagar viduat center

भुसावळ (जळगाव) :  येथील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात स्फोट होऊन, कामगार जखमी झाला असल्याची घटना आज (ता. २२) सायंकाळी घडली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दिपनगर केंद्रातील महाजनको कंपनीच्या ५०० मेगावॅट प्रकल्पात सायंकाळी बॉयलर जवळ शॉटसर्किट होऊन ब्लास्ट झाल्याची घटना घडली. यातून उडालेली फ्लाय अँश बाहेर पडून कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे सचिन शिंदे नामक कामगार जखमी झाला असल्याचे समजते. भुसावळतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जखमीस आणले असून, प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव मधील हॉस्पिटलला रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आपणास काही माहिती नसल्याचे 

शॉर्टसर्कीटमुळे घटना
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या ५०० मेगावॅट संचांत हॉपर हिटरच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ३० वर्षीय कर्मचारी भाजल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या कर्मचाऱ्यावर भुसावळातील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जळगाव येथील आर्चीड हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ५०० बाय दोनच्या संचातील हॉपर हिटर दुरुस्तीचे काम केले जात होते. याच दरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याने स्फोट होऊन, यातून उडालेली फ्लाय अँश बाहेर पडून कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे महानिर्मितीचा कर्मचारी  सचिन शिंदे (वय ३०) रा. दीपनगर हा भाजला गेला. त्याच्या डावा हात, चेहरा, डोक्यावरील केस जळाले. त्यात सहकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ भुसावळ येथील रिदम हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर प्रथमोचार करुन त्यास जळगाव येथील आर्चीड हॉस्पीटलमये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. 

अपघातांच्या घटनांमध्ये वाढ
दीपनगरात सातत्याने किरकोळ अपघात घडतात. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान जखमी सचिनचे लग्न ठरले असून आगामी दोन, तीन महिन्यांत लग्न होणार होते, यापूर्वीच हा अपघात झाला, अशी माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांचे वाऱ्यावर हात
याबाबत संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आपणास काही माहिती नसल्याचे सांगितले. तर काही अधिकाऱ्यांनी अशा घटनेची केवळ चर्चा आपण एकून असल्याचे सांगत, वाऱ्यावर हात करून या प्रकरणाचे गोंघडे झटकण्याचा प्रयत्न केला.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com