प्रवाशांसाठी चार अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या धावणार; कशा आणि कुठे पहा

railway
railway

भुसावळ : रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांसाठी १२ सप्टेंबरपासून अजून चार अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व गाड्या संपूर्ण आरक्षित असणार आहे. फक्त आरक्षणधारकच या गाडीमध्ये प्रवास करू शकतील. यामध्ये कोरोनासंदर्भातील सर्व नियम अटींचे पालन प्रवाशांना करावे लागणार आहे. 

भुसावळ विभागातून जाणार विशेष गाडी १२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मनमाड- मुंबई पंचवटी (गाडी क्रमांक ०२११० अप) विशेष गाडी (दररोज) ही स्थानकातून सकाळी ६.०२ वाजता रवाना होईल आणि मुंबईला १०.४५ वाजता पोहचेल. ही गाडी लासलगाव, निफाड, नासिक, देवळाली, इगतपुरी येथे थांबेल. मुंबई- मनमाड- पंचवटी (गाडी क्रमांक ०२१०९ डाऊन) ही विशेष गाडी (दररोज) ही स्थानकातून सायंकाळी ६.१५ ला रवाना होईल आणि मनमाडला १०.५० वाजता पोहचेल. बंगळूर- नवी दिल्ली- कर्नाटक (गाडी क्रमांक ०२६२७ डाउन) विशेष गाडी स्थानकातून रात्री ९.१५ रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ ला नवी दिल्लीला पोचेल. (दररोज) ही गाडी मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा येथे थांबेल. नवी दिल्ली- बंगळूर कर्नाटक (गाडी क्रमांक ०२६२८) विशेष गाडी (दररोज) स्थानकातून रात्री ९.१५ वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी दुपारी दीडला बंगरूळला पोचेल. बलसाड-मुजफ्फरपूर गाडी (क्रमांक ०९०५१ डाउन) श्रमिक विशेष गाडी (शनिवारी) स्थानकातून रात्री ८.१५ ला रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी मुजफ्फरपूर पोचेल. ही गाडी जळगाव, भुसावळ, खंडवा थांबेल. मुजफ्फपूर- बलसाड श्रमिक (गाडी क्रमांक ०९०५२ अप) विशेष गाडी (सोमवार) स्थानकातून रात्री ७.३० वाजता रवाना होईल आणि तिसरा दिवस ला पहाटे ५.०५ वाजता बलसाडला पोचेल. अहमदाबाद-पुरी गाडी (क्रमांक ०८४०६ डाउन) विशेष गाडी (शुक्रवारी) ही स्थानकातून सायंकाळी ६.४० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८.१० वाजता पुरीला पोचेल. जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा येथे थांबेल. पुरी-अहमदाबाद गाडी (क्रमांक ०८४०५ अप) विशेष गाडी (बुधवार) स्थानकातून सायंकाळी ६.२० वाजता निघून तिसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता अहमदाबादला पोहचेल.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com