भुसावळ मंडलमध्ये किसान एक्सप्रेला वाढला प्रतिसाद; 608 टन मालवाहतुक

चेतन चौधरी 
Thursday, 3 September 2020

भुसावल विभागाच्या महत्वाच्या स्टेशन जसे देवलाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपुर, खंडवा या स्टेशनहुन माल ची वाहतुक करण्यात आलेली आहे.

 

भुसावळ : गेल्या महिन्यात देवलाली ते दानापुर किसान एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणी नुसार गाड़ीला मुजफ्फरपुर पर्यंत विस्तार करण्यात आला. एक दिवस चालणारी गाडीला प्रतिसाद बघून आठवड्यातून 2 दिवस मंगळवार आणि शुक्रवार करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात भुसावळ विभागातुन किसान रेलवे द्वारे 608.13 टन माल हा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे. 

वाचा : अरे देवा ! कोविड चाचणी करणारी शासकीय ‘लॅब’ बाधित 
 

या किसान एक्सप्रेसमुळे जलद आणि स्वस्त वाहतुकीसह, चांगल्या किंमतीच्या आश्वासनासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे. शेत उत्पादनांचा नाश होऊ नये आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी किसान रेल महत्त्वपूर्ण आहे. कृषी उत्पादने जलद वाहतुकीद्वारे देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्या पर्यंत पोहचविले जात आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होत आहे. छोट्या शेतकऱ्यांच्या आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या गरजा भागविणारी ही किसान रेल जीवन परिवर्तक म्हणून सिद्ध होत आहे. किसान रेलवे ला भुसावल विभागामधे चांगला प्रतिसाद भेटत असून, किसान पार्सल गाड़ी ने आपल्या पहिल्या फेरी मधे 90.92 टन माल ची वाहतुक करण्यात आली. त्यानंतर दुसरया फेरीमधे 99.58 टन माल ची वाहतुक, तिसरी फेरी मधे 151.59 टन माल ची वाहतुक, चौथ्या फेरी मधे 108.06 टन माल ची वाहतुक आणि पाचव्या फेरी मधे 157.98 टन माल ची वाहतुक ही भुसावल विभागाच्या महत्वाच्या स्टेशन जसे देवलाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपुर, खंडवा या स्टेशनहुन माल ची वाहतुक करण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्यात भुसावल विभागातुन किसान रेलवे द्वारे 608.13 टन माल हा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे. मध्य रेल्वे आपल्या व्यवसाय विकास युनिटच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींशी सतत विपणन करून त्यांच्या मागण्या एकत्रित करत आहे. 

हेही वाचा: 'उघड दार देवा आता उघड दार ! मंदिर उघडण्याची माकडांना ही प्रतिक्षा    

शेतकऱ्यांना त्यांचा माल बुक करण्यासाठी त्याना माल पॅक करून हा आपल्या जवळ पासच्या पार्सल ऑफिस मध्ये आणावा लागेल. सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स ठेवावी लागेल. शेतकरी, कार्गो एग्री ग्रेटर, व्यापारी, बाजार समिती, आणि लोडर्स याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा लागेल. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Good response of farmers and traders to Kisan Express