महिलांचा हरतालिकेचा उपवास...याच दिवसी मिळाले असे काही सरप्राईज 

hartalika fast
hartalika fast

भुसावळ : लॉकडाऊनच्या काळात विनातक्रार एक हाती घर सांभाळणाऱ्या घरातील नारीशक्तीचा पुरुषांनी सत्कार केला. भारत विकास परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे हरतालिकेनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. 

हेही वाचा - अपंग शिक्षक सकाळी गेले फिरायला...मुंजोबाचे दर्शन घेण्यासाठी थांबले अन्‌ 

चार महिन्यांपासून करोना या वैश्विक महामारीच्या विळख्यात व त्यामुळे आलेल्या लॉकडाऊन सर्व जण अडकले आहेत. यावेळी प्रशासन, डॉक्‍टर्स, आरोग्य सेवक, पोलिस बांधव, सफाई कर्मचारी या सर्वांनी आपली काळजी घेतली म्हणून आपण त्यांना करोना योद्धा असे संबोधिले. परंतु, या सर्वांच्या जोडीला सर्वांच्याच घरात ज्या मातृशक्तीने आपली सर्वांची काळजी घेतली, घरातील सर्व मंडळींच्या जिभेचे चोचले पुरवले, घरातील अबाल वृद्धांच्या प्रकृतीची काळजी घेतली, घरात कोणी मदतीला नसतांना, कपडे, भांडी धुणे घरात स्वछता ठेवणे, सर्वात मुख्य म्हणजे या चार महिन्यात त्यांना कुठेही बाहेर सुद्धा पडता आले नाही तरीही कोणती तक्रार पण केली नाही. खऱ्या अर्थाने ती पण एक करोना योध्दाच आहे. अशा त्या मातृशक्तीचा पण सन्मान होणे आवश्‍यक होते. यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे परिषदेचे प्रांतसचिव योगेश मांडे यांनी सांगितले. 

महिला भारावल्या 
आज हरतालिका असल्याने मातृशक्ती पतीसाठी उपास करून दीघर्घयुष्याची व मंगलमय आयुष्याची कामना करतात, म्हणून याच दिवशी सकाळी पुजा झाल्यावर बुके, गुलाबपुष्प आदी देऊन परिषदेच्या सदस्यांनी पत्नी व आईचा सन्मान केला. सत्काराने घरातील महिला वर्ग भारावून गेला. रोज रोज बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेणे ही एक कसरतच होती. स्त्री शक्ती कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास समर्थ असते. कारण तिला माहीत असते कि घरातील पुरुषांचे तिला पूर्ण सकारात्मक सहकार्य असते. आज या हरतालिकेच्या दिवशी या आगळ्यावेगळ्या सन्मानाने सगळा महीला वर्ग आश्‍चर्ययुक्त खुष झाला. सगळ्या पुरुषमंडळींचे आम्ही आभारी आहोत. 

संपादन : राजेश सोनवणे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com