esakal | खासगी बस-व्हॅन अपघात,तरुणाचा मृत्यू; सुदैवाने मोठी घटना टळली
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बस-व्हॅन अपघात,तरुणाचा मृत्यू; सुदैवाने मोठी घटना टळली

खासगी बस-व्हॅन अपघात,तरुणाचा मृत्यू; सुदैवाने मोठी घटना टळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


भुसावळ : भरधाव खासगी बस व मालवाहू पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला. यात धुळे येथील व्हॅनचालकाचा जागीच मृत्यू (Death)झाला तर दोन सहप्रवासी जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील (National Highways) रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी (ता.२) मध्यरात्री हा अपघात झाला.

हेही वाचा: जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी, वाघूरचे आठ दरवाजे उघडले

यवतमाळ येथून महेंद्र ट्रॅव्हल्सची खासगी बस (जीजे १९, एक्स ९५९६) सुमारे ३५ प्रवाशांना घेऊन भरधाव सुरतकडे निघाली असताना भुसावळ येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ जळगावकडून भुसावळकडे येणाऱ्या मालवाहू पिकअप व्हॅन (छोटा हत्ती)(एमएच-१८ बीजी ०४) वर आदळली. या अपघातात व्हॅनचालक किशोर निंबा गिरासे (वय ३८, रा. नगावबारी, देवपूर, धुळे) हे जागीच ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले. तसेच खासगी बसचालकही जखमी झाला. अपघाताची माहिती कळताच पोलिस उप अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत व सहकाऱ्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यासाठी मदत केली.

हेही वाचा: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने घेतला आईचा जीव..

सुदैवाने मोठी घटना टळली..

दोघा वाहनांमध्ये धडक झाल्यानंतर बस खड्यात पडली आणि आर्धी बस पलटली. सुदैवाने प्रवाशांनी भरलेली खासगी बस पूर्ण उलटली नाही, अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती या
प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image
go to top