esakal | एसटी धावली; उत्पन्नात घट कायम 
sakal

बोलून बातमी शोधा

parivahan bus

कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे परिवहन महामंडळाच्या बस आगारामध्येच उभ्या असल्यामुळे महामंडळाचे उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे नियमानुसार बसमध्ये फक्त २२ प्रवाशांना प्रवेश देण्याचे व बस सॅनिटायिझ करून चालविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता.

एसटी धावली; उत्पन्नात घट कायम 

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : ‘अनलॉक’नंतर काही दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने आपली बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही प्रमाणात का होईना, प्रवाशांनी एसटीला प्रतिसाद दिला आहे. मात्र, तरीही एसटीचे उत्पन्न २५ टक्क्यांवर आले आहे. प्रवाशांचा वाढता कल पाहता बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 
‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे परिवहन महामंडळाच्या बस आगारामध्येच उभ्या असल्यामुळे महामंडळाचे उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे नियमानुसार बसमध्ये फक्त २२ प्रवाशांना प्रवेश देण्याचे व बस सॅनिटायिझ करून चालविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. मात्र, त्यालाही प्रवाशांनी अल्प प्रतिसाद दिला. महामंडळाने आता पूर्ण क्षमतेचे बस सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सध्या भुसावळ आगाराच्या गाड्या साधारण पाच ते साडेपाच हजार किलोमीटरच्या ४० फेऱ्यांचे नियोजन सुरू आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत बसफेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. 

उत्पन्नात पाच ते सहा लाखांची घट 
लॉकडाउनपूर्वी आगारातील बसची १५ ते २० हजार किलोमीटरच्या फेऱ्या होत होत्या. मात्र, सध्या त्या पाच ते साडेपाच हजारांवर आल्या असल्याने साधारण पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न घटून लाखावर आले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, प्रवाशांची वाढती संख्या पाहता गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांचा कल पाहता आतापर्यंत औरंगाबाद, जळगाव, बोदवड, नाशिक, सुरत, मेहकर, शेगाव, बुलडाणा, नंदुरबार (चोपडा मार्गे) यासह अनेक मार्गांवर फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. गाडीचा प्रवास सुरू होण्यापूर्वी संपूर्ण गाडी सॅनिटरायिझ करण्यात येते. त्यानंतर प्रवाशानचा सुरक्षित प्रवास सुरू होते. 
 
प्रवासी तात्कळतच 
अनेक वेळा बसस्थानकांवर आवश्यक प्रवासी संख्या नसल्यामुळे बस भरण्यासाठी चालक व वाहकांना बराच वेळ वाट बघावी लागत आहे. प्रवाशांना तासन् तास तात्कळत रहावे लागते. तसेच मार्गात ठिकठिकाणच्या थांब्यांवरही बस थांबतात व प्रवाशांची वाट बघत असल्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळही वाढत आहे. यामुळे प्रवासी तात्कळत राहतात किंवा पर्यायी खासगी वाहतुकीच्या मदतीने आपला पुढचा प्रवास करताना दिसत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे