पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून पाच लाखांचा ऐवज लांबवला

पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून पाच लाखांचा ऐवज लांबवला
patliputra express
patliputra expresspatliputra express

भुसावळ (जळगाव) : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या (Special train in coronavirus) सोडल्या जात असून, पाटलीपुत्र एक्स्प्रेसने (patliputra express) प्रवास करणाऱ्या कल्याण येथील रजिया सुलताना मुजाहिद खान या महिलेच्या झोपेचा फायदा घेत चोरट्याने महिलेची बॅग लांबवली. यात सोन्या, चांदीचे दागिने, रक्कम आणि मोबाईल असा सुमारे पाच लाख ६२ हजार २४० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना २९ मेस घडली. हा गुन्हा भुसावळ जीआरपी पोलिस (Bhusawal railway police) ठाण्यात बुधवारी (ता. २) रात्री दाखल करण्यात आला. (bhusawal-police-fir-patliputra-express-five-lakh-robbery)

कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात आहेत. या गाड्यांमध्ये फक्त आरक्षण तिकीट कनफर्म असलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश दिला जात अहे. मात्र गाडी आउटरला थांबल्यावर आरपीएफची नजर चुकवून बसणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रेल्वेतील चोऱ्यांच्या घटनासुद्धा वाढत आहेत. रेल्वेत आता पूर्वीसारखी प्रवाशांची गर्दी नसली तरी आउटरवरून बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक प्रवासी दंडाची पावती घेऊन प्रवास करीत असतात. म्हणजे हे एनवेळी गाडीत बसलेले प्रवासी असतात. यामुळे क्षमतेपेक्षा पुन्हा जास्तीचे प्रवासी गाडीत आढळत आहेत. कल्याण येथील रहिवासी रजिया सुलताना मुजाहिद खान या बक्सर ते कल्याण असा प्रवास एक्स्प्रेसच्या बी-५ या बोगीच्या ३३ व ३६ क्रमांकाच्या सीटवरून २९ मे या दिवशी करीत होत्या. याच प्रवासात असताना चोरट्याने खान यांची बॅग लांबवली.

patliputra express
‘कृष्णा’च्‍या उपग्रहाची दखल; ‘गिनीज बुक’कडून सन्मान

जबलपूर ते भुसावळदरम्यान चोरी

जबलपूर ते भुसावळदरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. भुसावळ येथे खान यांना जाग आल्यावर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी बोगीत सर्वत्र चोरीला गेलेल्या बॅगेचा शोध घेतला. मात्र बॅग मिळून आली नाही. सीटच्या खाली पाहणी केली, अन्य कंपार्टमेंटमध्ये पाहणी केली. मात्र चोरीला गेलेली बॅग मिळाली नाही.

कल्याणला गुन्हा दाखल

रजिया खान यांची बॅग चोरीला गेल्याप्रकरणी त्यांनी कल्याण येथे उतरल्यावर कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. चोरीचा गुन्हा कल्याण येथे दाखल झाल्यावर त्या गुन्ह्याचे कागदपत्रे ही बुधवारी भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्यात आल्यावर कल्याण येथून हा गुन्हा भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केरूळकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com