मुंबई- हावडा विशेष आरक्षित रेल्वे चालणार

mumbai hawda railway
mumbai hawda railway

भुसावळ (जळगाव) : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष आरक्षित गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई - हावडा - मुंबई (वाया इटारसी ,प्रयागराज चौकी) या दरम्यान विशेष आरक्षित गाड्या चालवण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 02322 डाऊन मुंबई हावडा व्हाया इटारसी प्रयाग्रज चौकी ही 3 डिसेंबर पासून ते पुढील आदेशापर्यंत दररोज मुंबई येथून रात्री 10.15 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी हावडा येथे 11.40 वाजता पोहोचेल. डाउन दिशामध्ये थांबा- नासिक- 1.40, मनमाड-2.40, चाळीसगाव- 3.38, जळगाव- 4.53, भुसावळ- 5.25, बुऱ्हाणपूर- 6.18, खंडवा- 7.33, हरदा ,इटारसी ,पिपरिया ,गाडरवारा ,करेली ,नरसिंगपुर श्रीधाम ,जबलपूर ,कटनी ,मैहर ,सतना ,माणिकपूर ,शंकर गड ,प्रयाग्रज चौकी ,विद्याचल मिर्झापूर ,चुनार ,पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन ,बाबूहा रोड ,सासाराम, डेहरी ऑन सोन, अनुग्रहा रोड ,गया ,कोडरमा, हजारीबाग रोड, पारसनाथ ,गोमोह ,धनबाद ,बराककार,आसनसोल, रानीगंज, दुर्गापुर,पनागढ, वर्धमान या स्थानकावर थांबेल. गाडी क्रमांक 02321 अप हावडा-मुंबई ही 1 डिसेंबर पासून दररोज हावडा स्टेशन येथून रात्री 11.25 वाजता प्रस्थान करेल आणि आणि तिसऱ्या दिवशी मुंबई दुपारी 1.30 येथे वाजता पोहोचेल. अप दिशामध्ये थांबा- 
खंडवा- 2.27, बुऱ्हाणपूर-3.23, भुसावल- 4.25, जळगाव- 4.58, चाळीसगाव- 6.09, मनमाड- 7.08, नासिक- 8.15 वाजता पोहोचेल. 

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com