
लखनऊ आणि प्रयागराज दरम्यान उत्सवासाठी विशेष उत्सव रेल्वे चालविण्यात येणार आहे.
भुसावळ (जळगाव) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ आणि प्रयागराज दरम्यान उत्सवासाठी विशेष उत्सव रेल्वे चालविण्यात येणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस -लखनऊ उत्सव विशेष गाडी (20 फेरी) गाडी क्रमांक 02107 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -लखनऊ उत्सव विशेष गाडी हि 16 डिसेंबर ते 30 जानेवारी पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारला प्रस्थान स्टेशनहून दुपारी 4.25 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लखनऊ स्टेशन 3.30 वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक – 02108 अप लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी हि दिनांक 17 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत दर मंगळवार, गुरुवार, रविवारी प्रस्थान स्टेशनहून रात्री 10.45 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन रात्री 9.50 वाजता पोहचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, नासिक रोड, भुसावळ, भोपाल, ललितपुर, झाँसी, ओरा, कानपुर सेंट्रल येथे थांबेल. लोकमान्य टिळक टर्मिनस- प्रयागराज एसी उत्सव विशेष गाडी (7 फेरी) गाडी क्रमांक 02153 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- प्रयागराज उत्सव विशेष गाडी 15 डिसेंबर ते 26 जानेवारीपर्यंत दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहून दुपारी 4.30 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी प्रयागराज स्टेशन 4.40 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक – 02154 अप प्रयागराज लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी 16 डिसेंबर ते 26 जानेवारीपर्यंत दर बुधवारी प्रस्थान स्टेशनहून रात्री 7 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन दुपारी 4.15 वाजता पोहचेल. कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावल, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, जबलपुर, कटनी, मैहर,सतना येथे थांबेल.
संपादन ः राजेश सोनवणे