esakal | तापी नदिपात्रात युवकाने फिल्मीस्टाईल उडी घेवून केली आत्महत्या  
sakal

बोलून बातमी शोधा

तापी नदिपात्रात युवकाने फिल्मीस्टाईल उडी घेवून केली आत्महत्या  

हतनुर गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावर मोटार सायकल उभी केली व पुलावरून नदीत उडी घेतली .रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी मोटार सायकल पाहुन देशमुख यांच्या घरी फोन करून कळविले. 

तापी नदिपात्रात युवकाने फिल्मीस्टाईल उडी घेवून केली आत्महत्या  

sakal_logo
By
विनोद सुरवाडे

वरणगाव ( ता. भुसावळ ) : वरणगाव फॅक्टरी मधील तेवीस वर्षीय युवकाने हतनुर येथे तापी नदी वरील पुला वरून नदि पात्रात उडि घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी संध्या काळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आज मृतदेह हाती आला आहे 

वाचा- जळगाव जिल्ह्यात चोविस तासांत दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू !
 

वरणगांव फॅक्टरी वसाहत मधील टाईप थ्री 46 मधील रहिवास प्रसाद रविन्द्र देशमुख या युवकाने हतनुर गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावर मोटार सायकल उभी केली व पुलावरून नदीत उडी घेतली .रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी मोटार सायकल पाहुन देशमुख यांच्या घरी फोन करून कळविले सावदा पोलीस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु रात्री अंधारात शोध घेणे अशक्य होते . आज दिवसभर शोध घेतला असता कठोरा गावालगत त्याचा मृतदेह सायंकाळी सापडला , मयताचे शव विच्छेदन वरणगांव ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले आहे या प्रकरणी वरणगांव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरू होते.

धक्कादायक : चक्क चार महिन्यापासून ट्रामा सेंटरमध्ये १०‘व्हेटीलेटर’धुळखात

प्रसाद वरणगांव फॅक्टरीमधील इंटक युनियनचे अध्यक्ष रवि देशमुख यांचा मुलगा होता , त्याने बी ई शिक्षण पूर्ण केलेले होते , स्वभावाने सोज्वळ होता , आत्महत्येचे कारण समजु शकले नाही , त्यांच्या पश्चात आई , वडील , बहीण परिवार असुन वरणगांव फॅक्टरी परीसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे

loading image
go to top