esakal | एनडीए, एनएच्या परीक्षार्थ्यांसाठी १२ विशेष रेल्वे गाड्या धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

एनडीए, एनएच्या परीक्षार्थ्यांसाठी १२ विशेष रेल्वे गाड्या धावणार

प्रवाशांनी आरक्षित टिकट काढूनच प्रवास करावा. आरक्षित टिकिट आरक्षण खिड़की वर किवा ऑनलाइन काढता येणार आहे. 

एनडीए, एनएच्या परीक्षार्थ्यांसाठी १२ विशेष रेल्वे गाड्या धावणार

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी ( एनए)च्या परीक्षा मध्ये सहभागी होणाऱ्या परीक्षार्थींना आपल्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वे ने 12 फेरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना कोविड-19 साठी देण्यात आलेले सर्व नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील. प्रवाशांनी आरक्षित टिकट काढूनच प्रवास करावा. आरक्षित टिकिट आरक्षण खिड़की वर किवा ऑनलाइन काढता येणार आहे. 

भुसावळ विभागातुन चालवण्यात येणाऱ्या गाड्यामध्ये गाड़ी क्र– 02163 डाउन नाशिक – नागपुर विशेष गाड़ी 5 सप्टेंबर रोजी नाशिक स्थानका वरुन दुपारी 4.10 वाजता प्रस्थान करेल व 6 सप्टेंबर रोजी नागपुर स्थानकावर 3 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 02164 अप नागपुर –नाशिक विशेष गाड़ी ही 6 सप्टेंबर रोजी नागपुर स्थानका वरुन रात्री 9.30 वाजता प्रस्थान करेल व 7 सप्टेंबरला नाशिक स्थानका वर सकाळी 7:30 वाजता पोहोचेल. ही गाडी वर्धा , बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड स्थानकावर थांबेल. गाड़ी क्र– 02161 डाउन मुंबई – नागपुर विशेष गाड़ी ही 5 सप्टेंबर ला मुंबई स्थानका वरुन 5.15 वाजता प्रस्थान करेल व 6 सप्टेंबर ला नागपुर स्थानका वर सकाळी 6 वाजता पोहोचेल. ही गाडी नासिक , मनमाड, भुसावळ, अकोला- आणि बडनेरा येथे थांबेल. गाड़ी क्र– 02162 अप नागपुर – मुंबई विशेष गाड़ी ही 6 सप्टेंबर ला नागपुर स्थानका वरुन सायंकाळी 6 वाजता प्रस्थान करेल व 7 सप्टेंबरला मुंबई स्थानकावर 10.45 वाजता पोहोचेल.


गाड़ी क्र– 01139 डाउन अमरावती – नागपुर विशेष गाड़ी ही 6 सप्टेंबरला अमरावती स्थानकावरुन रात्री 1.15 वाजता प्रस्थान करेल व 6 सप्टेंबरला नागपुर स्थानकावर सकाळी 5.25 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 01140 अप नागपुर - अमरावती विशेष गाड़ी – 6 रोजी नागपुर हून दुपारी 12 वाजता प्रस्थान करेल व 7 रोजी अमरावती स्थानका वर पहाटे 4 वाजता पोहोचेल. 
गाड़ी क्र– 02165 डाउन जळगाव – नागपुर विशेष गाड़ी ही 5 रोजी जळगाव स्थानका वरुन रात्री 9.30 वाजता प्रस्थान करेल व 6 रोजी नागपुर स्थानकावर पहाटे 4.20 वाजता पोहोचेल. ही गाडी भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबेल.
गाड़ी क्र– 02166 अप नागपुर - जळगाव विशेष गाड़ी 6 रोजी नागपुर स्थानका वरुन रात्री 10.45 वाजता प्रस्थान करेल व 7 ला जळगाव स्थानकावर पहाटे 5.40 वाजता पोहोचेल.


गाड़ी क्र– 01141 डाउन अकोला – नागपुर विशेष गाड़ी 6 रोजी अकोला स्थानका वरुन रात्री साडेबारा वाजता प्रस्थान करेल व 6 रोजी ला नागपुर स्थानकावर पहाटे 5 ला पोहोचेल. गाड़ी क्र– 01142 अप नागपुर - अकोला विशेष गाड़ी 6 रोजी नागपुर स्थानकावरुन रात्री 8 वाजता प्रस्थान करेल व 6 रोजी अकोला स्थानकावर रात्री पावणे बाराला पोहोचेल.
गाड़ी क्र– 02167 डाउन अहमदनगर – नागपुर विशेष गाड़ी 5रोजी अहमदनगर स्थानका वरुन दुपारी चारला प्रस्थान करेल व 6 रोजी नागपुर स्थानकावर 4 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 02168 अप नागपुर - अहमदनगर विशेष गाड़ी 6 रोजी नागपुर स्थानका वरुन रात्री दहाला प्रस्थान करेल व 7 रोजी अहमदनगर स्थानकावर सकाळी 10.40 वाजता पोहोचेल.
गाड़ी क्र– 02169 डाउन पनवेल – नागपुर विशेष गाड़ी 5 रोजी पनवेल स्थानका वरुन दुपारी 1.50 वाजता प्रस्थान करेल व 6 रोजी नागपुर स्थानकावर पहाटे 3.30 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 02170 अप नागपुर - पनवेल विशेष गाड़ी ही 6 रोजी नागपुर स्थानका वरुन 10.30 वाजता प्रस्थान करेल व 7 रोजी पनवेल स्थानकावर दुपारी 12 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 01132 डाउन अहमदनगर – मुंबई विशेष गाड़ी 5 रोजी अहमदनगर स्थानका वरुन रात्री नऊला प्रस्थान करेल व 6 रोजी मुंबई स्थानकावर पहाटे 5.35 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 01131 अप मुंबई - अहमदनगर –विशेष गाड़ी 6 रोजी मुंबई स्थानका वरुन रात्री 8.35 वाजता प्रस्थान करेल व अहमदनगर स्थानकावर पहाटे 4.40 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 01134 अप नासिक - मुंबई विशेष गाड़ी 5 रोजी नाशिक स्थानकावरुन 11.45 वाजता प्रस्थान करेल व 6 रोजी मुंबई स्थानकावर पहाटे 4.05 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 01133 डाउन मुंबई -नाशिक विशेष गाड़ी 6 रोजी मुंबई स्थानका वरुन रात्री 11.30 वाजता प्रस्थान करेल व नाशिक स्थानकावर पहाटे 3.15 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 02156 अप भुसावल - मुंबई विशेष गाड़ी 5 रोजी भुसावळ स्थानका वरुन रात्री सव्वा नऊला प्रस्थान करेल व 6 रोजी मुंबई स्थानकावर पहाटे 5.20 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 02155 डाउन मुंबई - भुसावल - विशेष गाड़ी 6 रोजी मुंबई स्थानका वरुन 9.30 वाजता प्रस्थान करेल व 7 रोजी भुसावळ स्थानकावर पहाटे 04.30 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 01137 डाउन कोल्हापुर- नागपुर विशेष गाड़ी 5 रोजी कोल्हापुर स्थानका वरुन सकाळी 08.05 वाजता प्रस्थान करेल व 6 रोजीला नागपुर स्थानकावर पहाटे 05.40 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 01138 डाउन नागपुर-कोल्हापुर विशेष गाड़ी 6 रोजी नागपुर स्थानका वरुन रात्री 8 वाजता प्रस्थान करेल व 7 रोनी कोल्हापुर स्थानकावर सायंकाळी 6.30 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 02159 डाउन पुणे - नागपुर विशेष गाड़ी ही 5 रोजी पुणे स्थानका वरुन दुपारी 4.15 वाजता प्रस्थान करेल व 6 रोजी नागपुर स्थानकावर पहाटे 6.15 वाजता पोहोचेल. गाड़ी क्र– 02160 डाउन नागपुर- पुणे विशेष गाड़ी 6 रोजी नागपुर स्थानका वरुन रात्री 8.30 वाजता प्रस्थान करेल व 7 रोजी पुणे स्थानकावर सकाळी 11.55 वाजता पोहोचेल.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image