esakal | मोटारसायकल झाडावर धडक...इंडियन ऑईल कंपनीचा अधिकारी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident

सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संकेत मुंडे हे (एमएच.३० झेड.९४२०) या दुचाकीवरून धुळेकडून औरंगाबादकडे जात होते. या दरम्‍यान मेहूणबारे येथे जामदा फाट्याजवळ त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या खाली उतरून झाडावर आदळली.

मोटारसायकल झाडावर धडक...इंडियन ऑईल कंपनीचा अधिकारी ठार

sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : भरधाव मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून इंडियन ऑईल कंपनीतील ल्युब ऑफीसरचा मृत्यु झाल्याची घटना चाळीसगाव- धुळे रस्त्यावर जामदा फाट्याजवळ आज सकाळी घडली. मृत अधिकारी अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील रहिवासी आहे.


संकेत बाबुराव मुंडे (वय २४) रा. हनुमान मंदिरजवळ, संतोष नगर, कोकणवाडी, मूर्तीजापूर, अकोला हे इंडियन ऑईल कॉ. कंपनीत ल्युँब ऑफीसर, ऑईल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असून कंपनीच्या कामानिमीत्त त्यांचे धुळे येथे जाणे येणे सुरु होते. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संकेत मुंडे हे (एमएच.३० झेड.९४२०) या दुचाकीवरून धुळेकडून औरंगाबादकडे जात होते. या दरम्‍यान मेहूणबारे येथे जामदा फाट्याजवळ त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या खाली उतरून झाडावर आदळली. त्यात अपघात होवून मुंडे यांना जबर मार लागला. त्यात त्यांचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मेहूणबारे पोलीसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेला. याप्रकरणी किरण संभाजी वराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत शिंदे हे करीत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे