esakal | अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा उपोषणाला बसू; संतप्त शेतकऱ्यांनी दिला इशारा !
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा उपोषणाला बसू; संतप्त शेतकऱ्यांनी दिला इशारा !

वाळू चोरांच्या विरोधात पोलीसही काही करू शकत नाही अशी स्थिती आहे. वाळू माफियांनी वाळू वाहतुकीसाठी समांतर रस्तेही तयार केले आहेत.

अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा उपोषणाला बसू; संतप्त शेतकऱ्यांनी दिला इशारा !

sakal_logo
By
दिपक कच्छवा

मेहुणबारे(ता.चाळीसगाव): चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीपात्रातुन होणारी अवैध वाळू चोरी शेतकऱ्यांच्या मूळावर आली आहे.बैलगाड्या,ओमन, ट्रॅ्क्टरद्वारे बिनबोभाट वाळू उपसा होतच आहे. वाळू माफियांनी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे रस्तेही खराब करून टाकले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाल्याने मेहूणबारे येथील संतप्त शेतकऱ्यांनी  शनिवारी तलाठी कार्यालय तसेच मेहूणबारे पोलीस ठाण्यावर धडक देत दोन दिवसात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करून वाळू उपसा थांबवावा अन्यथा तलाठी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा दिला आहे.

मेहूणबारे परिसरात गिरणा पट्ट्यात अवैध वाळू उपशाने कहर केला आहे. महसूल व पोलीस यंत्रणेला न जुमानता ही वाळू चोरी सर्रास सुरु आहे.विशेष म्हणजे भर पावसाळ्यातही ही चोरी महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून होत आहे.या वाळू चोरांच्या विरोधात पोलीसही काही करू शकत नाही अशी स्थिती आहे. वाळू माफियांनी वाळू वाहतुकीसाठी समांतर रस्तेही तयार केले आहेत. तर नेहमीच्या वहीवाटीच्या रस्त्यांवरही बेसुमार वाळू वाहतुक करून हे रस्तेच खराब करून टाकले आहे.

रस्त्याची झाली चाळण

खंडेराव मंदिराजवळील गिरणा पात्रातून वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे.रात्रीच्या वेळेस ओमनी व बैलगाड्यांच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असून त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.शेतकऱ्यांसह नागरीकांना पायी चालणे देखील आवघड झाले आहे.

अन्यथा उपोषणाला बसू

येत्या दोन दिवसात रस्त्यावरील अवैध वाळू वाहतुक थांबवून वाळू चोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अन्यथा शेतकरी तलाठी कार्यालयासमोर उपोषणास बसतील व होणाऱ्या परिणामास तलाठी व मंडळ अधिकारी, मेहूणबारे हे जबाबदार असतील असा इशारा शेतकऱ्यांनी तलाठी तथा मंडळ अधिकारी, मेहूणबारे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी मेहूणबारे पोलीस ठाण्यावरही धडक देत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.आज येथील शेतकऱ्यांनी निवेदन मेहूणबारे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना दिले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी चाळीसगाव,तहसीलदार चाळीसगाव व सरपंच मेहूणबारे यांनाही देण्यात आले.

वाळू माफियांचा कहर

गेल्या काही दिवसापासून गिरणा परिसरात वाळू माफियांनी अक्षरशा कहर केला आहे. रात्रंदिवस ओमनी, ट्रॅ्क्टर, बैलगाड्यांद्वारे अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतुक केली जात आहे. या चोरीच्या विरोधात वाळू गस्ती पथकाकडून कारवाया देखील करण्यात आल्या असूनही वाळू चोर जुमानेसे झाले आहेत. या वाळू चोरांना मेहूणबारे पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे अभय असल्याचीही चर्चा असून त्यामुळेच ते कुणालाही बिनबोभाट वाळू चोरी करीत आहे.विशेष म्हणजे गिरणेला मोठ्या प्रमाणावर पाणी येवूनही वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही.मेहूणबारे, लांबे वडगाव व रहीपुरी भागात सर्वाधिक वाळू चोरी होत आहे.

वाळू चोरी होत असल्यास सरळ संपर्क साधा

मेहूणबारे पोलीस ठाण्याचेसहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांनी आज सकाळी सरळ मेहूणबारे पोलीस ठाणे गाठत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या समोर कैफियत मांडली. यावेळी निरीक्षक बेंद्रे यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजुन घेत जेथे तुम्हाला वाळू चोरी होतांना दिसून आली तत्काळ आपल्याशी व पोलीसांशी संपर्क साधावा असे असे आवाहन केले.यावेळी शेतकऱ्यांनी पोलीस अधिकारी संपर्क क्रमांकही घेतले.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top