गरुजू विद्यार्थीनीसाठी शासकीय सेवेतील माणूसकी जागी झाली..

गुणवंत विद्यार्थी गौरव, पालक प्रेरणा सोहळा व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन असे नानाविध उपक्रम राबवून आरंभ गृपने सामाजिक कार्यात आपली चुणूक दाखवली आहे.
गरुजू विद्यार्थीनीसाठी शासकीय सेवेतील माणूसकी जागी झाली..

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): चिंचगव्हाण (ता.चाळीसगाव) विद्यार्थीनीने (Student) दहावीत चांगले गुण मिळवत पुढे शिक्षण घेण्याची तयारी केली. मात्र घराची अत्यंत हालाखीची परिस्थिती वडिल अपंग, आई शेतात काम करुन कुटुंबाचा गाडा ओढते.अशा वेळी या चिमुरडीच्या डोळ्यातील भाव लक्षात घेऊन शाासकीय सेवेत (Government Service) असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यातील माणूसकी जागी झाली अन् सुरु झाला आर्थिक मदतीचा (Financial Help) ओघ.या मदतीतूनच सावित्रीची लेक पुढचे शिक्षण घेऊ शकणार आहे. समाजात चांगली माणसे जोवर आहेत तोवर खडतर व बिकट वाटही सुकर होवून जाते हे पुन्हा एकदा चांगल्या उपक्रमाने दाखवून दिले.

गरुजू विद्यार्थीनीसाठी शासकीय सेवेतील माणूसकी जागी झाली..
जळगावातील गुन्हेगारी संपविण्यासाठी 'मास्टर प्लॅन'-डीआयजी शेखर

चिंचगव्हाण येथील अनुसया आत्माराम पवार या मुलीला दहावीत 96 टक्के गुण मिळाले. पुढे शिकण्याची तिची प्रचंड जिद्द पण घरची परिस्थिती गरीबीची. आत्माराम पवार ह्यांना चार मुली. दोघींचे लग्न झालेले. अनुसयासह आणखी एक बहिण व आई वडिल असा परिवार. आत्माराम पवार हे अपंग असल्याने मंगलाबाई ह्या शेतीकाम करून कुटुंबाचा गाडा हाकतात. अनुसया ही सर्वात लहान मुलगी उपजतच हुशार. चिंचगव्हाण माध्यमिक विद्यालयात दहावीत तिने 96 टक्के मार्क मिळवले. शिक्षणाची हौस पण गरीबीची परिस्थिती आडवी आलेली.

व्हॉटसअप गृपची मदत

या परीस्थितीत 'आरंभ' या व्हॉटसअप गृप अनुसयाच्या मदत धावून आला आणि तिच्या जीवनात आनंद फुलला..गुणवंत विद्यार्थी गौरव, पालक प्रेरणा सोहळा व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन असे नानाविध उपक्रम राबवून आरंभ गृपने सामाजिक कार्यात आपली चुणूक दाखवली आहे. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनाशी बाळगून हा गृप कार्य करत आहे. या ग्रुपला डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, आयकर सहआयुक्त मुंबई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असते.

गरुजू विद्यार्थीनीसाठी शासकीय सेवेतील माणूसकी जागी झाली..
परवानगी मिळाल्यास मुंबई लोकलच्या धर्तीवर पॅसेंजर धावणार

तहसीलदारांसह अनेकांची मदत

अनुसया पवार हिच्या पुढच्या शिक्षणाला जळगाव महानगरपालीकेचे मुख्य लेखाधिकारी कपील पवार, चाळीसगावचे मिशन आयएएस समन्वय प्रविण पवार यांनी खान्देशी अधिकारी गृपवर मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देत तहसीलदार दीपक पाटील, शिवाजी ढोले मित्र परिवार यांच्या वतीने 11 हजार रूपये, गोरख पवार दहिवद यांच्यातर्फे 1100 व अन्य ठिकाणाहून असे 39 हजार 100 रूपयांची आर्थिक मदत जमा झाली. जमा झालेली ही मदत अनुसया व तिच्या वडिलांना सुपुर्द करण्यात आली. या छोट्याशा मदतीने का होईना अनुसयाच्या पंखांना भरारी घेता येवुन पुढचे शिक्षण घेता येणार आहे.मदतीचे मोल नसते मिळालेली मदत सार्थकी लागतेय याचे समाधान मोठे असते.आरंभ गृप पुढील काळातही गुणवंत विद्यार्थी गौरव, पालक प्रेरणा सोहळा व स्पर्धा परिक्षा अशा उपक्रमांद्वारे आर्थिक सहकार्य करणार आहे असे सांगण्यात आले.या कार्यक्रमाला गावातील व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com