कन्नड घाटावरून जाताय तर थांबा; दुरूस्‍तीला सुरवात तरीही सांभाळा

kannada ghat
kannada ghat

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : कन्नड (औट्रम घाट) घाटाची खड्ड्यांमुळे भयंकर दुर्दशा झाली आहे. वाहने नादुरूस्त होत असल्याने घाटातील वाहतुक जॅम झाली होत असते. याचा अनुभव सलग दुसऱ्या दिवशी आला. आज पुन्हा चार वाहने नादुरुस्त होवून घाटातच अडकल्याने सकाळपासून पुन्हा वाहतुक जॅम झाली. या संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच महामार्गाच्या दुर्दशेची आज (ता.१८) महामार्ग प्राधिकरणाचे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. यामुळे अवजड वाहतुक चाळीसगाववरुन नांदगाव- देवगाव रंगारी मार्गे तर कन्नडकडून देवगाव- रंगारी-नांदगाव मार्गे चाळीसगाव अशी वळवण्यात आली आहे.

कन्नड घाट वारंवार जॅम होण्याचे नित्याचे झाले आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी जीवघेण्या खड्ड्यांमुळे तब्बल पाच वाहने घाटातच नादुरूस्त झाली होती. यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये जिल्हा टुडेपानावर कन्नड घाटाससह वाहनधारकही जाम या मथळ्याखाली (ता.१८) रोजी वृत्त प्रसिद्ध होताच महामार्ग प्राधिकरण विभागाने तातडीने दखल घेत खड्डे बुजविण्यास सुरवात केली. त्यामुळे घाटातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीसांना अक्षरशा घाम फोडावा लागला. वारंवार घाट जाम होण्याच्या प्रकारामुळे घाटातील वाहतुकच बंद पडण्याची भिती व्यक्त होत होती ती खरी ठरली आहे. आणखी पुन्हा चार वाहने नादुरूस्त होवून पडल्याने घाटातील वाहतुक वारंवार ठप्प होत आहे. ही वाहतुक सुरळीत करण्याठी महामार्ग पोलीसांना अक्षरशा रात्रंदिवस जीव धो्नयात घालावा लागत आहे.घाटातील खड्डे बुजविण्याचे काम आता सुरु झाले आहे.

वाहने होतात नादुरुस्त
गेल्या पाच दिवसात जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरूस्त झालीत.त्याचा ताण वाहतुकीवर पडला. त्यामुळे घाटातच वाहने अडकून पडून दुतर्फा रांगा लागतात. गेल्या आठवडाभरापासून असा एकही दिवस जात नाही की घाटातील वाहतुक सुरुळीत होत नाही. घाटातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीसांना रात्रंदिवस शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

अवजड वाहतुक वळवली
कन्नड घाटात पुन्हा काही वाहने नादुरूस्त झाल्याने वाहतुक ठप्प पडली. त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कुठलीही पूर्व सुचना न देता घाटातील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे धावपळ उडाली. त्यातच आज पुन्हा घाटात वाहने नादुरूस्त झाल्याने घाटातील वाहतुक वळवण्यात आली आहे.त्यामुळे महामार्ग पोलीसांनी आज सकाळपासूनच घाटातून जाणारी अवजड वाहतुक चाळीसगावकडून नांदगाव-देवगाव रंगारी ते औरंगाबादकडे अशी वळवली आहे. तर कन्नडकडून चाळीसगावकडे येणारी अवजड वाहतुकही देवगाव रंगारी ते नांदगाव मार्गे चाळीसगाव कडे वळविण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीसांकडून देण्यात आली. वारंवार घाटात वाहतुक ठप्प होवू लागल्याने अवजड वाहतुक अन्य मार्गाने वळविण्याशिवाय पर्याय नसल्याचे महामार्ग पोलीसांचे म्हणणे आहे. मात्र हलकी वाहनांना घाटातून ये-जा  करण्यास मुभा आहे.दोन वर्षापूर्वी कन्नड जवळील शिवणा नदीवरील पुलाच्या कामानिमीत्त घाटातील वाहतुक तब्बल वर्षभर बंद ठेवण्यात आली आहे.आता घाटाच्या दुर्दशेमुळेच पुन्हा घाटातील अवजड वाहतुक बंद करण्याची वेळ आली.

महामार्ग पोलीसांची जीवघेणी कसरत
खड्डयामुळे वाहने नादुरूस्त होतात आणि घाटातील वाहतुक ठप्प होते. शेकडो वाहने कित्येक तास अडकून पडतात. दोन दिवसाच्या घटनेनंतर आज पुन्हा तीच परिस्थिती उदभवली. महामार्ग पोलीस विभागाचे हवालदार शाम सोनवणे, सुनील पाटील, गणेश काळे, पोना धनराज नाईक, मिलींद सोनवणे, पोकॉ प्रकाश चव्हाण हे वाहतुक सुरळीत करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.खड्ड्यांची दुरूस्ती होईपर्यंत तुर्त घाटातील वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली.

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com