वरखेडे येथे बिबट्याची दहशत सुरूच..नागरिकांमध्ये घबराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरखेडे येथे बिबट्याची दहशत सुरूच..नागरिकांमध्ये घबराट

वरखेडे येथे बिबट्याची दहशत सुरूच..नागरिकांमध्ये घबराट

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) शिवारात धनगर बांधवांच्या पाड्यावरील घोड्यांवर (Horse) बिबट्याने (Leopard) हल्ल्याचा (Attack) प्रयत्न केला. दरम्यान, बिबट्याच्या दहशतीने धनगर कुटुंबाने जीव मुठीत ठेवून अख्खी रात्र जागून काढली.

हेही वाचा: शेतकऱ्यांची थट्टा..विम्याची प्रतिगुंठा १३५ रुपये भरपाई


वरखेेडे येथील भिकन पगारे यांच्या शेतात निंबा गवळी (रा. तळवाडे, ता. सटाणा, जि. नाशिक) यांचा मेंढ्यांचा पडाव पडला आहे. त्यांच्याकडे मेंढ्यांबरोबर पाळीव घोडे व त्यांचे शिंगरू आहेत. मंगळवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास गवळी यांचे पाळीव कुत्रे व बाजूला बांधलेले तीन घोडे जोरात आवाज करीत असल्याने निंबा गवळी यांना जाग आली. पाहिले तर बिबट्या घोड्याच्या शिंगरूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होता. धनगर गवळी यांनी मोठमोठ्याने आवाज करून बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या फिरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत होता. पहाटे तीनपर्यंत बिबट्याने या वाड्यावर धडक देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: जळगावमध्ये दोन मजली इमारत कोसळली

शेवटपर्यंत त्याला शिंगरूची शिकार करता आली नाही. पहाटे तीननंतर बिबट्याचे येणे बंद झाले व गवळी कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्याच्या धास्तीने त्यांनी अख्खी रात्र जीव मुठीत घेऊन जागून काढली. या भागात वन विभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीसह नागरिकांनी वेळोवेळी केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी वन विभागाकडून पिंजऱ्यांसाठी कुठलीच तरतूद करता येत नाही, असे उत्तर दिले आहे. वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिसपाटील राधेशाम जगताप यांनी केली आहे.

loading image
go to top