
मराठा समाजाच्या आरक्षणा विरोधात बेताल वक्तव्य केल्याने दोन समाजा मध्ये दुही निर्माण करणाऱ्या वृत्तीचा चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध केला आहे
चाळीसगाव : ओबीसी नेता श्रावण देवरे याने मराठा आरक्षणाला प्रखर विरोध करून राजर्षी शाहु महाराज, सयाजीराव गायकवाड, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, आण्णासाहेब पाटील या महापुरुष व बहुजन समाजात स्थान असणाऱ्या महान व्यक्तीविषयी खालच्या भाषेत व्यक्तव्य करून अवमान केल्याने श्रावण देवरेच्या प्रतिकात्मक फोटोला येथील तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे जोडे मारो आंदोलन आज सकाळी 11 वाजता करण्यात आले. यावेळी श्रावण देवरेच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणा देण्यात आल्या.
वाचा- ‘सभा के चारो और बम है’फडणवीसांच्या कार्यक्रमात आली धमकी आणि उडाली खळबळ !
मराठा आरक्षणाविरोधात मोहीम उघडून ओ. बी. सी. नेता श्रावण देवरे याने मराठा समाजा विरोधात अपशब्द वापरले आहे. श्रावण देवरे सह ओ बी सी नेत्यांनी वरवर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचे वरवर दाखविले .मात्र मराठा आरक्षणा विरोधात चिथावणी खोर भाषा वापरल्याने मराठा समाजात तीव्र संताप यावेळी व्यक्त केला.
मराठा समाजाच्या आरक्षणा विरोधात बेताल वक्तव्य केल्याने दोन समाजा मध्ये दुही निर्माण करणाऱ्या वृत्तीचा चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध केला आहे. श्रावण देवरे याने तात्काळ मराठा समाजाची जाहीर माफी न मागितल्यास श्रावण देवरे या विकृत माणसाला मराठा समाज महाराष्ट्रात फिरु देणार नाही.असा इशारा दिला. आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे