‘सभा के चारो और बम है’ फडणवीसांच्या कार्यक्रमात आली धमकी आणि उडाली खळबळ ! 

सुरेश महाजन
Wednesday, 14 October 2020

हिंदीत बोलणाऱ्याने ‘सभा के चारो ओर बॉम्ब रखे है, ए बात आपको बता देता हू, आपको क्या करना है ये देखो.

जामनेर : येथे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थितीत कार्यक्रम होता. तत्पूर्वी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने हिंदीत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली, त्यानंतर एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा मेसेज आला अन् सभास्थळी चांगलीच खळबळ उडाली.

आवश्य वाचा- खडसेंचा घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश ? असे ठरलेय प्रवेशाचे सुत्र
 

या घटनेबाबत दीपक तायडे यांनी तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी (ता. १३) बीओटी कॉम्प्लेक्समध्ये विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना तायडे यांच्या भ्रमणध्वनीवर दुपारी ३ वाजून १८ मिनिटांनी एक कॉल आला. तो त्यांनी रिसिव्ह केला असता समोरून हिंदीत बोलणाऱ्याने ‘सभा के चारो ओर बॉम्ब रखे है, ए बात आपको बता देता हू, आपको क्या करना है ये देखो.

टेक्स मॅसेज ही आला

३ वाजून ३७ मिनिटांनी ‘टेक्स मॅसेज’ आला. त्यात इंग्रजी शब्दांत हिंदी मजकूर असा ‘पाच बजेतक एक करोड भेज दे, महाजन को बोलदे, नही तो बहुत बडा धमाका हो जाएगा, मालेगाव मे मेरे आदमी खडे है, नही तो तुम्हारी मर्जी। असा मजकूर आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner blast at the Fadnavis venue in Jamner sparked an uproar