esakal | मोटारसायकलला मागून धडक; एकाचा मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

चाळीसगाव- धुळे रस्त्यावर असलेली जीवघेणी अपघाला कारणीभुत ठरत आहेत. या रस्‍त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले तरी निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून होत आहे. यामुळेच रस्‍त्यावर निपराध तरुणाचा मृत्यू झाला.

मोटारसायकलला मागून धडक; एकाचा मृत्‍यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव-धुळे रसत्याववरील असलेले खड्डे हे जिवघेणी ठरत आहेत. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात चालकाचा जागीच मृत्यु झाला. त्याच्यासोबत असलेला दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री घडली. मृत तरुण तरवाडे (ता. धुळे) येथील आहे.
 
चाळीसगाव- धुळे रस्त्यावर असलेली जीवघेणी अपघाला कारणीभुत ठरत आहेत. या रस्‍त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले तरी निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून होत आहे. यामुळेच रस्‍त्यावर निपराध तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेतील मयत आनंदा चुडामण तलवारे (वय ३५) त्याच्यासोबत एक इसम (नाव माहित नाही) हे बुधवारी सायंकाळी (एमएच.४१यू.३४६७) दुचाकीने चाळीसगावकडून तरवाडे येथे जात असतांना खडकीफाटा ते चिंचगव्हाण दरम्यान दत्त मंदिराच्या पुढे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात आनंदा तलवारे या तरुणाला जास्त मार लागल्याने जागीच मृत्यु झाला. त्याचेसोबत असलेला इसम गंभीर जखमी झाला. या धडकेत मोटारसायकलीचा चक्काचूर झाला. धडक देणारा अज्ञात वाहनचालक पळून गेला. याप्रकरणी शामा तलवारे रा. (तरवाडे)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय पृथ्वीराज कुमावत करीत आहेत.
 

loading image