esakal | चाळीसगावच्या सुपुत्राने रोवला ऑस्ट्रेलियात कर्तृत्वाचा झेंडा
sakal

बोलून बातमी शोधा

चाळीसगावच्या सुपुत्राने रोवला ऑस्ट्रेलियात कर्तृत्वाचा झेंडा

या पदाच्या शर्यतीत होते.परंतु चुरशीच्या या प्रक्रीयेत ऑस्ट्रेलिया निवडणुक आयोगाच्या अध्यक्षांनी भारतातील जयंत पाटील यांची एकट्याचीच निवड जाहीर केली. 

चाळीसगावच्या सुपुत्राने रोवला ऑस्ट्रेलियात कर्तृत्वाचा झेंडा

sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): विदेशात जावून कर्तुत्वाचा झेंडा रोवत खानदेशातील अनेक तरुणांनी आपल्या गावाचे नाव रोशन केले आहे.चाळीसगाव तालुक्यातीलच अर्जुन देवरे हे भारतीय परराष्ट्र सेवेत विदेश राजदूत म्हणून कार्यरत आहे. आता वरखेडे बुद्रूक (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी तथा स्टेट बँकेचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर बाबुसिंग पाटील यांचे सुपूत्र जयंत पाटील (कच्छवा) यांनी ऑस्ट्रेलियात आपल्या कर्तुत्वाचा झेंडा रोवला आहे. जयंत पाटील यांची ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नुकतीच निवड झाली आहे.त्यांनी सिडनी येथील मुख्यालयात पदभार स्वीकारला. या नियुक्तीने चाळीसगाव तालुक्याचे नाव सातासमुद्रपार पोहचवले आहे. अत्यंत महत्वाच्या अशा निवडणूक आयोगाच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जयंत पाटील यांचे सर्व स्थतरातून अभिनंदन होत आहे.
  
 जयंत (मुन्नादादा) बाबुसिंग पाटील (वरखेड़े बु.।।) यांची ऑस्ट्रेलियन सरकारच्या एका अतीमहत्वाच्या सरकारी विभागात उच्चपदी नेमणुक झाली आहे.ऑस्ट्रेलियाच्या निवडणुक आयोगात प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख म्हणुन सिडनी येथील मुख्यालयात नुकताच पदभार स्विकारला.

अनेक देशातील होते स्पर्धेक

या पदासाठी अनेक देशातील उमेदवार (ब्रिटन,जर्मनीसह, ऑस्ट्रेलिया) या पदाच्या शर्यतीत होते.परंतु चुरशीच्या या प्रक्रीयेत ऑस्ट्रेलिया निवडणुक आयोगाच्या अध्यक्षांनी भारतातील जयंत पाटील यांची एकट्याचीच निवड जाहीर केली. 

स्थानिक व राज्य पातळीवरील निवडणुकांचे नियोजन, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे, माहीती-तंत्रज्ञान विभागातील प्रणालींची देखरेख, ऑस्ट्रेलिया संसदेने ठरवुन दिलेले नियम व दिशा निर्देश यांचे पालन करण्याची जबाबदारी जयंत पाटील हे निवडणुक आयुक्तांच्या मार्गदर्शनाख़ाली पार पाडतील. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर ऑस्ट्रेलियातील न्यु साउथ वेल्स या राज्यातील सप्टेंबरमधे होणाऱ्या निवडणुका वर्षभर पुढ़े ढकलण्याच्या व त्यासाठी इंटरनेट वोटिंग प्रणालीचा वापर करण्याच्या निर्णयप्रक्रीयेत  जयंत पाटील यांचा महत्वाचा सहभाग आहे.
    
विद्यार्थ्यांना दिली ६० संगणक

जयंत पाटील यांनी बार्कलेज, मेरील लिंच व मॉर्गन स्टॅनली आदी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमधे उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. सध्या या भागातील विद्यार्थी संगणक क्षेत्रात ही भरारी घेत आहेत.आपल्या देशातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे म्हणून जयंत पाटील यांची नेहमी धडपड असते. वरखेडे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चांगले संगणकीय ज्ञान मिळावे म्हणून जयंत पाटील यांनी 60 संगणक उपलब्ध करून दिले होते. 

ऑस्ट्रेलियात रोवला वरखेडेचा झेंडा

जयंत पाटील यांचे मूळ गाव वरखेडे असून त्यांचे वडिल बाबुसिंग पाटील हे स्टेट बँकेत जनर मॅनेजर पदावर होते. दोन वर्षापूर्वी ते रिटायर्ड झाले. सध्या ते वरखेडे येथे सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. बाबुसिंग पाटील यांनी आपल्या  मुलांना उच्चशिक्षीत केले.या आपल्या कष्टाच्या आणि बुद्धीच्या जोरावर जयंत पाटील यांनी प्रगतीचे अनेक शिखरे पादाक्रांत करीत ऑस्ट्रेलियातील निवडणूक आयोगाच्या प्रकल्प व्यवस्थापक पदापर्यंत धडक दिली.त्यांचे शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण धुळे येथे झाले. वरखेडेसह  चाळीसगाव व   खान्देशचा झेंडा जयंत पाटील यांनी ऑस्ट्रेलियात फडकावला आहे.चाळीसगाव तालुक्याच्या सुपुत्राने सातासमुद्र पार करीत गगन भरारी घेत तालुक्याचे नाव रोशन केले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top