
सीएससी वायफाय समन्वयक वाल्मीक महाले यांनी सांगितले, की जळगाव जिल्ह्यात एकूण ६५१ ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा सुरू करण्याचे काम सुरू आहे.
चाळीसगाव : सीएससी वायफाय चौपाल भारत नेटअंतर्गत तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींसह टपाल कार्यालय, रेशन दुकान, जिल्हा परिषद शाळा, बँक, पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, तलाठी कार्यालय व सीएससी केंद्रांना मोफत इंटरनेट सेवा सुरू होत आहे.
पंचायत समितीत पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब केदार यांच्या हस्ते याचा प्रारंभ झाला. सीएससी वायफाय समन्वयक वाल्मीक महाले यांनी सांगितले, की जळगाव जिल्ह्यात एकूण ६५१ ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा सुरू करण्याचे काम सुरू आहे. १०८ ग्रामपंचायतींना शुक्रवार (ता. १७)पासून इंटरनेट सेवा सुरू करण्याचे काम करीत आहोत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शासकीय कार्यालय, वैक्तिक घरी आणि दुकानदार, व्यापाऱ्यांना वायफाय ब्रॉड बॅन्ड कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यात येईल. ग्रामीण भागातील उद्योग-व्यवसाय, सेतू सुविधा, शेतमाल खरेदी-विक्री, बँक सेवा, टेलिमेडिसिन, ई-कोर्ट, मोबाईल बँकिंग, नोकरी मार्गदर्शन केंद्र, महिला बचतगट केंद्र, गॅस बुकिंग केंद्र, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सेवा केंद्रांना इंटरनेटचा फायदा होणार आहे. या योजनेला ‘डिजिटल व्हिलेज’ असे म्हणतात. या योजनेंतर्गत फक्त गावोगाव ऑप्टिक फायबरद्वारे इंटरनेट पोचवणे नसून गावातील नागरिकांना डिजिटल साक्षरता व शिक्षित करून गावाचा विकास अधिक ग्लोबल होण्यासाठी तसेच डिजिटल इंडिया संकल्पना ग्रामीण भागात पोचून ग्रामीण संकल्पना व ऊर्जा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याने गावातील युवकांना रोजगार, शिक्षण, नोकरी, उद्योग-व्यवसायासाठी फायदा होणार आहे. प्रथम चरणात ग्रामपंचायत व सीएससी केंद्रांना मोफत इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे.
सीएससी भारत नेट सेवा प्रधान करण्यासाठी अनिल शेंडे, वाल्मीक महाले, राहुल देवरे, अभिनंदन पाटील, गजानन पाटील, उत्कर्ष वाणी व ओएफसी तुफान टीम चाळीसगाव आदी मेहनत घेत आहेत.
बीडीओ अतुल पाटील, सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, संजय पाटील, स्मिता बोरसे, जिभाऊ पाटील, श्री. केदार, दिनेशभाऊ, भोरस सरपंच गोपाल पाटील, गोलू पाटील, श्री. चकोर, शिवा सर, संदीप रणदिवे, राहुल पाटील, राहुल अहिरे, चेतन महाजन आदी उपस्थित होते.