esakal | तलावाच्या बांधावरील २८ झाडांची केली कत्तल..गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

 tree broke

तलावाच्या बांधावरील २८ झाडांची केली कत्तल..गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवामेहुणबारे (ता. चाळीसगाव) : तिरपोळे (ता. चाळीसगाव) येथे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाच्या बांधावरील तब्बल २८ डेरेदार वृक्षांची विनापरवाना कत्तल (tree broke) करून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या तिघांविरोधात मेहुणबारे पोलिस (Police Case) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रातील ही आहेत प्रसिध्द प्रमुख ठिकाणे

तिरपोळे येथे गट क्रमांक ७८.०२ येथे उपविभागीय अधिकारी जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद उपविभागाने (लघु पाटबंधारे) पाझर तलाव बांधला आहे. हा तलाव तिरपोळे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित आहे. असे असताना तलावाच्या बांधावरील पिंपळ, आंबा, जांभूळ, बाभूळ अशी डेरेदार २८ झाडे संशयित संजय तिरमली, राहुल तिरमली, अविनाश तिरमली (सर्व रा. तिरपोळे) यांनी ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता १७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान कापून लंपास केली.

हेही वाचा: जळगाव राष्ट्रवादीत गटबाजी..अन त्यावर अजितदादांचा प्रभावी ‘डोस’

या विनापरवाना वृक्षतोडीबाबत तिरपोळे ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह गावकऱ्यांनी विचारले असता संजय तिरमली याने परवानगी नसल्याचे सांगत सरपंचांना धमकी दिली. यानंतर सरपंचांनी बेकायदा वृक्षतोडीबाबत जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाला विचारणा केल्यानंतर पाझर तलावाच्या संरक्षणाची जबाबदारी ही तिरपोळे ग्रामपंचायतीची असल्याचे पत्र दिले. याप्रकरणी संशयित संजय तिरमली, राहुल तिरमली, अविनाश तिरमली (सर्व रा. तिरपोळे) यांच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष पाटील तपास करीत आहेत.

loading image
go to top