esakal | जळगाव राष्ट्रवादीत गटबाजी..अन त्यावर अजितदादांचा प्रभावी ‘डोस’
sakal

बोलून बातमी शोधा

Deputy Chief Minister Ajit Pawar

जळगाव राष्ट्रवादीत गटबाजी..अन त्यावर अजितदादांचा प्रभावी ‘डोस’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील (Nationalist office resign) यांच्यासह फ्रंटलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीची खळबळ उडालेली होती. या कलहावर पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी सोमवारी संबंधितांना ‘डोस’ पाजले.

हेही वाचा: मुलाचे पार्थिव नेण्यासाठी वृद्ध बाप भिक्षा मागतो तेव्हा..!

निमित्त होते, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या गटातील कामांच्या ऑनलाइन उद्‌घाटनाचे. हा व्हर्च्युअल कार्यक्रम झाल्यानंतर बोलताना अजित पवार यांनी जळगावात सुरू असलेल्या पक्षांतर्गत गटबाजीवर भाष्य केले. आणि आजितदादांनी त्यांच्या शैलित पक्षातील गटबाजी करणाऱ्यांना डोस पाजून चांगलेच खडसावले.

पेपरबाजी करणे योग्य नाही..

अजितदादा म्हणाले, की ‘‘जळगावात पक्षांतर्गत जे काय चालले आहे, त्याच्या आधीही तक्रारी प्राप्त झाल्या. पक्ष एक परिवार आहे आणि परिवारातील गोष्टींची पेपरबाजी करणे योग्य नाही. पक्षापेक्षा कुणी मोठा नाही, पक्ष कुणासाठी थांबत नाही, याची जाणीव प्रत्येकानेच ठेवली पाहिजे. पक्षाची जबाबदारी एखाद्यावर दिली तर दुसऱ्याला ते पद सोडावेच लागते. त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही.’’ अशा शब्दात पवारांनी या गटबाजीवर भाष्य करत संबंधित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ‘डोस’ पाजले.

हेही वाचा: पहिल्याच मुहूर्ताला कापसाला मिळाला सात हजारांचा भाव

पक्षाला कुणी वेठीस धरू नये

दोन दिवसांपूर्वीच महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या राजीनाम्यानंतर महानगरातील विविध १२ फ्रंटलच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले होते. पक्षावरील दबावतंत्र झुगारून लावण्याचे संकेत देत पवारांनी पक्षाला कुणी वेठीस धरू नये, असेही बजावले.

loading image
go to top