esakal | जिल्हाधिकाऱ्यांकडे आली तक्रार; आणि तत्काळ विवाह सोहळ्यावर कारवाई

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकाऱ्यांकडे आली तक्रार; आणि तत्काळ विवाह सोहळ्यावर कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांकडे आली तक्रार; आणि तत्काळ विवाह सोहळ्यावर कारवाई
sakal_logo
By
आनंन शिंपी


चाळीसगाव ः विवाह सोहळ्यात २५ पेक्षा जास्त वर्हाडींना परवानगी नसतानाही विवाह लावला जात असल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांपर्यंत गेल्यानंतर त्यांच्या आदेशान्वये शहरातील कन्नड रस्त्यावरील मंगल कार्यालयात विवाहाचे आयोजन करणार्यावर पालिकेतर्फे ५० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिका व छोट्या व्यावसायिकांमधून कौतुक होत आहे.

हेही वाचा: डॉक्टर आजोबाची कमाल ! मधुमेह, दमा, हृदयविकार..तरीही कोरोनावर मात

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिाकर्यांच्या आदेशान्वये केवळ २५ जणांच्या उपस्थितीतच विवाह करण्याला परवानगी दिलेली आहे. असे असताना कन्नड रस्त्यावरील कमलशांती पॅलेज या हॉटेलमध्ये आज लासूर (जि. औरंगाबाद) येथील विवाह सोहळा पार पडत होता. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आली होती. उच्चभ्रू कुटुंबातील विवाह असल्याने अनेक चारचाकी वाहने हॉटेलच्या बाहेर तसेच हॉटेलपासून काही अंतरावर शेतात लावलेली होती. त्यामुळे या विवाह सोहळ्याला २५ पेक्षा जास्त वर्हाडींची उपस्थिती होती. हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडत असल्याने त्याबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ होते. या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका जागृत नागरिकाने व्हॉट्सॲपद्वारे तक्रार केली. हॉटेलच्या बाहेरील पार्किंगचे तसेच आतील काही दृष्यही जिल्हाधिकार्यांना पाठवले. त्याची दखल घेत, जिल्हाधिकार्यांनी स्थानिक प्रशासनाला तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: व्यापारी झाले पोलीस मित्र,आता करती शहरात रात्रगस्त !

पन्नास हजारांचा दंड
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस कर्मचारी गणेश पाटील, महसूलचे शैलेश राजपूत महसूल, पालिकेचे दिनेश जाधव, कुणाल महाले, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, सुमित सोनवणे आदींच्या पथकाने मंगल कार्यालयात धडक दिली. यावेळी २५ पेक्षा जास्त वर्हाडींची उपस्थिती आढळून आल्याने विवाह सोहळा आयोजित करणार्या संजय जैस्वाल (रा. लासूर) यांच्यावर ५० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, ज्यांच्या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा सुरु होता, त्या हॉटेल मालकावर मात्र कुठलीच कारवाई प्रशासनाने केली नाही. मात्र, तीन दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाने संबंधित हॉटेलमध्ये जास्त वेटर्स आढळून आल्याने दंडात्मक कारवाई केली होती.

संपादन- भूषण श्रीखंडे