esakal | डाॅक्टर आजोबाची कमाल ! मधुमेह, दमा, हृदयविकार..तरीही कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टर आजोबाची कमाल ! मधुमेह, दमा, हृदयविकार..तरीही कोरोनावर मात

डॉक्टर आजोबाची कमाल ! मधुमेह, दमा, हृदयविकार..तरीही कोरोनावर मात

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : तीस वर्षांपासून मधुमेह, तीनदा ॲन्जिओप्लास्टी व एकदा बायपास सर्जरी.. दम्याचा त्रास, फुफ्फुसांवरील शस्त्रक्रिया अशा विविध व्याधींनी ग्रस्त ७३ वर्षीय वृद्धाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपण हे करु शकतो, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी अन्य रुग्णांना दिला.

हेही वाचा: अरे बापरे..सिव्हिलमध्ये आग ! नंतर सर्वांचा सुटकेचा निःश्‍वास

अयोध्यानगरातील रहिवासी डॉ. सुभाष देपुरा हे ३० वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त आहेत. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा त्रासही जडला. तीनदा ॲन्जिओप्लास्टी झाल्यात, एकदा बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान ते क्रिटिकलही झाले होते. परंतु, त्यातून बाहेर आले. दम्याचाही त्यांना त्रास असून फुफ्फुसांची शस्त्रक्रियाही झाली आहे.

हेही वाचा: संपर्कातील ‘हाय रिस्क’ व्यक्तींचा ४८ तासाच्या आत शोध घ्या!

कोरोनावर मात

असे असताना गेल्या आठवड्यात १८ एप्रिलला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, त्यांनी घाबरुन न जाता, सकारात्मकपणे या आजाराला तोंड दिले. डॉ. कल्पेश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व स्वत:च्या इच्छाशक्तीचे बळ या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात ९ लाख संशयितांची झाली कोरोना चाचणी

लशींचा डोस पूर्ण

डॉ. देपुरा यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा (कोविशील्ड) दुसरा डोस १३ एप्रिलला घेतला होता. नंतरच्या आठवड्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाली तरी लशीमुळे त्यांना गंभीर त्रास झाला नाही, त्यामुळे लस घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन त्यांनी इतरांना केले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image