esakal | व्यापारी झाले पोलीस मित्र,आता करती शहरात रात्रगस्त !
sakal

बोलून बातमी शोधा

night patroling

व्यापारी झाले पोलीस मित्र,आता करती शहरात रात्रगस्त !

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ: लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व दुकानें बंद आहेत. त्या बंद दुकानांमधून रात्रीच्या वेळेस चोरी होण्याची शक्यता असते. शिवाय सद्यस्थितीमध्ये पोलीस दल देखील हे लॉकडाऊन बंदोबस्तामध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा: अरे बापरे..सिव्हिलमध्ये आग ! नंतर सर्वांचा सुटकेचा निःश्‍वास

त्यामुळे पोलिसांना जर व्यापारी वर्गाकडून पोलीस मित्र म्हणून रात्र गस्तीसाठी मदत मिळाल्यास ते संभाव्य चोरीच्या घटना रोखण्यासाठी मदतगार ठरू शकेल या संकल्पनेतून उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी व्यापारी पोलीस मित्र ही संकल्पना दोन दिवसांपूर्वी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीमध्ये मांडली. या संकल्पनेला व्यापारी वर्गातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. याच्या अंमलबजावणीस प्रत्यक्षात सुरुवात झाली. खालील व्यापारी पोलीस मित्र यांनी काल रात्री साडे अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष पोलिसांसोबत पायी गस्त केली.

हेही वाचा: हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..उन्हाळ्यातही नाही वितळत मुर्तीवरील लोणी

विशाल वाधवानी, सनी वाधवानी, राहुल दोदानी, अजय नागराणी, प्रकाश चांदवानी, केशव गेलानी या व्यापारी मित्रांच्या दोन टीम करून त्यांना मुख्य बाजारपेठेमध्ये पोलीस अंमलदार सोबत देऊन पायी गस्त देण्यात आली होती. ती त्यांनी जबाबदारीने पार पाडली. एपीआय अनिल मोरे यांनी रस्ते दरम्यान भेटी देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. एपीआय कृष्णा भोये, एपीआय अनिल मोरे एपीआय धुमाळ, एपीआय हरीश भोये हे पोलीस अधिकारी दररोज या व्यापारी पोलीस मित्रांना रात्रगस्त दरम्यान भेट देऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देणार आहेत.यापुढेही दररोज व्यापारी पोलीस मित्र ही संकल्पना भुसावळ शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. व्यापारी वर्गाकडून देखील या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image