शेतात नाही युरियाचा 'दाणा' तरी कृषिभूषण ठरले वडणेचे 'दिलीपनाना' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farm

शेतात नाही युरियाचा 'दाणा' तरी कृषिभूषण ठरले वडणेचे 'दिलीपनाना'

गणपूर (ता चोपडा) : खानदेशात (Khandesh) सध्या खरिपाची धामधूम सुरू आहे. कुठे खरीपपूर्व लागवड , तर कुठे पेरणी, कुठे खतांची (Fertilizer) घाई तर कुठे कांदा बियाण्याची (Seed Scarcity) टंचाई. मात्र अश्या परिस्थिती एक बाब चर्चेत आहे. ती म्हणजे युरिया खत (Urea fertilizer) पण पंधरा वर्षे खताचा दाना न टाकताही वडणे (जि.धुळे) येथील दिलीप रामदास पाटील उर्फ दिलीप नाना 2011 मध्ये सेंद्रिय कृषिभूषण (Organic Krishibhushan) ठरले. त्यांची ही कृषीतील यशोगाथा. (farmer no use of fertilizer for fifteen years good organic farm)

हेही वाचा: प्रदेश काँग्रेसचे पुढील अधिवेशन फैजपूरला होणार

दिलीप रामदास पाटील गेली पंधरा वर्षे सेंद्रिय शेती करतात सहा एकर क्षेत्रात त्यांचे यावर्षी सोयाबीन, मका, मूग, बाजरी ही पिके घेण्याचे नियोजन आहे. सेंद्रिय सीताफळ 200 रुपये किलो ,आणि दोन हजार रुपये क्विंटलने ते मका विकतात. शेती समृद्धी फार्म कडून सेंद्रिय म्हणून प्रमाणित केली असून त्यांच्या मार्फत ते शेतीमाल विकतात. खानदेशात पाहिले सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र त्यांच्या शेतात असून सेंद्रिय शेतीवर ते कोकण ते विदर्भ माहिती देण्यासाठी जातात. रासायनिक खतांशी त्यांचा संबंध कधीच तुटला आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उतरता आलेख सुरूच

बांधावर गिरीपुष्प झाडांची भिंत

पिकाला नायट्रोजन मिळावा म्हणून त्यांच्या बांधावर दोन हजार गिरीपुष्पाची झाडांची भिंतच उभी केल्याचे ते सांगतात. त्यामुळे युरियाचा गोणी मिळत नाही म्हणून फिराफिर नाही, की नॅनो लिक्विड युरियाचे एट्रक्शन त्यांना नाही. कांदा लागवड करायची तर पिकापूर्वी गिरीपुष्पची पाने त्या क्षेत्रात सडवायची. कंपोस्ट वापरायचे, धैंचा पेरायचा हाच त्यांचा उपक्रम आहे. गव्हाच्या पिकातील उंदीर पळण्यासाठी ते गिरीपुष्पाचे येणारे लाल फुल बिळा जवळ ठेवतात त्यात उंदीर पळून जातात. आदिवासी पट्यात त्याच वृक्षाला उंदिरमारे म्हणतात. हे ही त्यांनी शोधून काढले आहे.

टॅग्स :FarmerFarm