प्रदेश काँग्रेसचे पुढील अधिवेशन फैजपूरला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

प्रदेश काँग्रेसचे पुढील अधिवेशन फैजपूरला होणार


जळगाव : फैजपूरला काँग्रेसच्या (Congress) १९३६ मध्ये झालेल्या ग्रामीण अधिवेशनाची (Rural Convention) पार्श्वभूमी आहे. तो धागा पकडत येणाऱ्या काळात कोविड निवळल्यानंतर प्रदेशाचे तीन दिवसीय अधिवेशन (Three day convention) फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात फैजपूर (Faizpur) येथेच घेणार अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी दिली.

(next session pradesh congress convention will be faizpur)

जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जळगावी पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde), प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी(MLA Shirish Chaudhary), माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, शोभा बच्छाव आदी उपस्थित होते. श्री. पटोले पुढे म्हणाले, गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला मोदींना वेळ नाही. इंग्रज राजवटीविरोधात देशाने जसा लढा दिला, तसाच लढा आता मोदी सरकारविरोधात द्यायची वेळ आली आहे. ‘झोळी घेऊन आलोय’ असे म्हणणाऱ्या मोदींना झोळी घेऊन सत्तेतून परत पाठवू.


तीनही पक्षांची कामांबाबत तक्रार
सत्तेत असून काँग्रेसच्या आमदारांची कामे होत नाहीत, अशा तक्रारी आहेत, याबद्दल छेडले असता पटोले म्हणाले, सत्तेतील तीनही पक्षांच्या आमदारांची कमी- अधिक प्रमाणात ही तक्रार आहे. मात्र, त्यामागची कारणे अनेक आहेत. केंद्र सरकारने राज्याचा जीएसटीचा १ लाख कोटींचा हिस्सा अद्याप दिला नाही. दोन्ही बजेट कोरोनामुळे प्रभावित झाल्याने राज्यातील विकासकामांवर त्याचा परिणाम झाल्याचे ते म्हणाले.

भाजपची दुटप्पी भूमिका

विधिमंडळाचे अधिवेशन दोनच दिवसांचे घेण्याबद्दल त्यांनी फडणवीसांवर टीका केली. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत काही ठरवायचे आणि जाहीरपणे दुसरे बोलायचे ही भाजपची दुटप्पी भूमिका योग्य नाही, असे ते म्हणाले.

कायद्यामुळे शेतकरी उद्धवस्थ

तीन काळ्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र असून इंग्रजांविरोधात काँग्रेसने जो लढा दिला, तोच संघर्ष इंग्रजांची मानसिकता असलेल्या मोदी सरकारविरोधात सुरु राहील.

मोदींनी ठरवले तर कोरोना जाईल
पहिल्या व दुसऱ्या लाटेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून जनसेवा केली. तिसरी लाट येऊ घातली असून त्यादृष्टीने सतर्कतेचे आदेश प्राप्त झाले आहे. त्यासाठीही कार्यकर्ते सज्ज आहेत. कोविडचा आढावा जिल्हानिहाय घेत असून त्यासंबंधी प्रशासनाला सूचना करीत आहोत, असे सांगताना मोदींनी ठरवले तर कोरोना जाईल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patole